चढावरून अचानक कंटेनर आला मागे, आणि काही कळायच्या आत...

चढावरून अचानक कंटेनर आला मागे, आणि काही कळायच्या आत...

दापोली तालुक्यातील नवशी फाटा जवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातात दगावलेली व्यक्ती विद्यापीठातील कर्मचारी आहे

  • Share this:

रत्नागिरी, 28 सप्टेंबर : जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील नवशी फाट्याजवळ  चढावरून कंटेनर अचानक रिव्हर्स आल्यानं मागे असणाऱ्या दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दापोली तालुक्यातील नवशी फाटा जवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातात दगावलेली व्यक्ती विद्यापीठातील कर्मचारी आहे.

दापोली तालुक्यातील टेटवली येथील कदम वाडीतील 45 वर्षीय सुरेश कात्रे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील हॉर्टीकल्चर विभागात कामाला होते. ते सकाळी आपल्या कर्तव्यावर निघाले असता कुंभवे नदी या पुलावरून जात असता हा अपघात घडला.

गळ्यात पाटीनं घालून पोलीस स्टेशनमध्ये पोहचला कुख्यात गुंड आणि...

त्यांच्या पुढे पूर्ण क्षमतेने भरलेला एक कंटेनर खेडकडून दापोलीकडे जात होता. हा कंटेनर चढामध्ये अचानक बंद पडला होता. त्यामुळे अचानक हा कंटनेर चढावरून मागे यायला लागला.

त्याचवेळी या कंटेनरच्या मागून सुरेश कात्रे हे आपली मोटरसायकल घेऊन दापोलीकडे येत होते. अचानकपणे मागे येणाऱ्या कंटेनरने सुरेश कात्रे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.

विकास फक्त पवारांच्या बारामतीतच होतोय, राष्ट्रवादीच्या आमदाराचा घरचा आहेर

धडक दिल्यानंतर कात्रे हे दुचाकीसह खाली पडले आणि चाकाखाली सापडले. या अपघातात सुरेश कात्रे हे जागीच ठार झाले. सुरेश कात्रे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सुरेश कात्रे यांच्या अपघाती निधनामुळे कात्रे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: September 28, 2020, 1:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या