मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पुण्यात उद्यापासून असे होतील बदल, कुठे सूट तर कुठे बंदी कायम

पुण्यात उद्यापासून असे होतील बदल, कुठे सूट तर कुठे बंदी कायम

Pune: Barricades are seen at Khadki Cantonment after seven family members of a COVID-19 positive patient tested positive for the coronavirus infection during a nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, in Pune, Saturday, April 18, 2020. (PTI Photo)(PTI18-04-2020_000124B)

Pune: Barricades are seen at Khadki Cantonment after seven family members of a COVID-19 positive patient tested positive for the coronavirus infection during a nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, in Pune, Saturday, April 18, 2020. (PTI Photo)(PTI18-04-2020_000124B)

पुण्यात आधीचेच निर्बंध कायम राहणार आहेत. शहराच्या सीमा सील राहणार आहे. फक्त पुणे शहर अथवा जिल्ह्यातून मजुरांना परराज्यात जाता येईल.

पुणे, 03 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा उद्यापासून उठणार आहे. त्यामुळे राज्यातील रेड झोन असलेल्या पुण्यात काही बदल होणार आहे. परंतु, संचारबंदी शिथिल होणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात शनिवारी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना बळीचा आकडा 103 वर पोहोचला आहे. शनिवारी  दिवसभरात 97 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने  जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1912 वर पोहोचला आहे. हेही वाचा - 11 मे रोजी होऊ शकतो मोठा दहशतवादी हल्ला, गुप्तचर यंत्रणेला अलर्ट दुसरीकडे पुणे जिल्हा हा रेड झोनमध्ये असल्याने आणि शहरात अनेक ठिकाणे हॉटस्पॉट असल्याने उद्या म्हणजे 4 मे पासून संचारबंदीमधून निर्बंध शिथील होतील हा कयास धुळीस मिळाला आहे. पुण्यात आधीचेच निर्बंध कायम राहणार आहेत. शहराच्या सीमा सील राहणार आहे. फक्त पुणे शहर अथवा जिल्ह्यातून मजुरांना परराज्यात जाता येईल. मात्र, पुण्यातून राज्यातील अन्य शहरात किंवा गावात जाता येणार नाही. आत्तापर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसंच विविध तहसीलदार कार्यालय यांच्याकडे परराज्यात-परगावी जाण्यासाठी साडेपाच हजार अर्ज आले आहेत. परराज्यात जाणाऱ्या मजुरांना केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, त्यांच्या गावी सोडण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्रात काम करण्यास मुभा दरम्यान, पुणे शहर आणि ग्रामीण भागात कंटेन्मेंट झोन अर्थात अतिसंक्रमणशील (सील केलेला भाग ) सोडून इतर ठिकाणी फिजीकल डिस्टसिंग पाळून बांधकाम क्षेत्रातील कामे सुरू करता येतील, असं जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा - सोशल डिस्टन्स ठेवत पार पडलेल्या लग्नाचा VIDEO व्हायरल,काठी वापरून घातली 'वरमाला' रेड झोनमध्ये या गोष्टींवर बंदी - रेड झोनमध्ये सायकल रिक्षा, ऑटोरिक्षा, टॅक्सी, टॅक्सी  APP सेवा, आंतर जिल्हा आणि जिल्ह्य़ांतर्गत बससेवा, केशकर्तनालय, स्पा, सलून या सेवांवर बंदी - बिगर जीवनावश्यक सेवा फक्त सकाळी 7 ते संध्या 7 सुरू राहील. गरज भासल्यास जमावबंदी लागू. - सर्व श्रेणींमध्ये 65 वर्षांहून अधिक वयोगटातील मधुमेह वगैरे गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुलांनी घरातच राहणे गरजेचे. - तीनही श्रेणीत बाह्य़रुग्ण विभाग सुरू राहतील. पण, नियंत्रित विभागात मात्र मुभा नाही. - वाइन शॉप्स, पानाची दुकानं फक्त ग्रीन झोनमध्येच उघडली जाणार - खरेदी करताना ग्राहकांनी सहा फुटांचं अंतर राखणं आवश्यक - एकावेळी शॉपमध्ये पाचपेक्षा जास्त लोक नकोत महाराष्ट्रातले किती जिल्हे ग्रीन झोनमध्ये महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 11 हजार 500हून अधिक आहे. त्यामध्ये मुंबईसह उपनगर, पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशभरात मृतांचा आकडा 1 हजार 152 वर पोहोचला आहे. तर उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा हे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या