S M L

सोनिया आणि राहुल गांधीही लवकरच जेलमध्ये-सुब्रमण्यम स्वामी

या वर्षाअखेरीस नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधीही लवकरच जेलममध्ये जातील त्यामुळे आगामी अखिल भारतीय काँग्रेसची बैठक तिहार जेलमध्ये होणार

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2018 09:06 AM IST

सोनिया आणि राहुल गांधीही लवकरच जेलमध्ये-सुब्रमण्यम स्वामी

नागपूर, 23 जून : काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली की पुढच्या निवडणुकांनंतर पाकिस्तानचे चार तुकडे होतील असं वक्तव्य भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली.

नागपुरात लोकतंत्र सेनानी संघातर्फे आणीबाणी लागू झाल्याचा दिवसाच्या निमित्ताने आपातकाल स्मृती दिवस या कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी बोलत होते.

या वर्षाअखेरीस नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधीही लवकरच जेलममध्ये जातील त्यामुळे आगामी अखिल भारतीय काँग्रेसची बैठक तिहार जेलमध्ये होणार असल्याची उपहासामत्मक टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली.तसंच हिंदु दहशतवादच्या नावावर कर्नल पुरोहित सारख्या सैन्याधिकाऱ्यासह अनेकांना तुरुंगात यातना देणाऱ्या देशाचे तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांना मी एअरसेल मँक्सिस प्रकरणात चागंलेच अडवल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलंय. आता लवकरच चिदंबरम यांच्यासह त्यांचा मुलगा, पत्नी आणि मेहुण्यालाही तुरुंगात पाठविणार असल्याचे स्वामी म्हणाले.

काश्मिरच्या मुद्द्यावर बोलतांना केंद्र सरकराने काश्मिरात अतिरेक्यांची हिट लिस्ट काढून त्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्र सरकारने सैन्याला सुट दिली आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली की पुढच्या निवडणुकांनंतर पाकिस्तानचे चार तुकडे होतील असंही स्वामी म्हणाले. यावेळी स्वामी यांनी आणीबाणीच्या काळात राज्यसभेचे खासदार असतांनाही पोलिसांची अटक चुकविण्यासाठी सरदाराच्या वेशात कसे वावरलो आणि पोलीस तसंच सरकारची कशी नजर चुकविली याचे किस्से सांगून सभागृहात एकच हशा पिकवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 09:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close