सुबोध जयस्वाल मुंबईचे नवे पोलीस आयुक्त !

सुबोध कुमार हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुबोध जयस्वाल हे सध्या रॉचे अधिकारी आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 30, 2018 07:24 PM IST

सुबोध जयस्वाल मुंबईचे नवे पोलीस आयुक्त !

मुंबई, 30 जून : महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची आज घोषणा करण्यात आलीये. सुबोध जयस्वाल यांची मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.

सुबोध कुमार हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुबोध जयस्वाल हे सध्या रॉचे अधिकारी आहेत. सुबोध जयस्वाल आज दुपारी मुंबईत दाखल झालेत. त्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीये.

पतीने जादूटोणा केल्याचं सांगून मांत्रिकाने 50 लाखांना लुटले!

दत्ता पडसलगीकर यांनी पोलीस महासंचालकपदाचा कारभार स्विकारला. त्यानंतर सुबोध जयस्वाल यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन चार्ज घेतला.

कोण आहेत सुबोध कुमार जैस्वाल?

Loading...

- सुबोध कुमार हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी

- तेलगी प्रकरणात तपास अधिकारी होते

- सुबोध कुमार हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी

कोण होतं आयुक्तपदाच्या शर्यतीत ?

संजय बर्वे ?

- १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी

- सध्या राज्यगुप्त वार्ता विभागाचे प्रमुख

- चमकदार कामगिरी नाही पण प्रशासनावर उत्तम पकड

- पण आदर्श घोटाळ्यात नावं आल्याने काहिसा अडसर

परमबीर सिंग?

- १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी

- एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशा ख्याती

- पण विरोधी पक्षांशी जवळीक अडचणीची

रश्मी शुक्ला?

- सध्या पुणे पोलीस आयुक्तपदी

- मुंबई पोलीस आयुक्तपदी पहिली महिला म्हणून संधी मिळू शकते

- पण, महाराष्ट्र बॅंक प्रकरणामुळे सरकारची खप्पा मर्जी होऊ शकते

दरम्यान, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या पदाचा कार्यकाळ आज संपला. त्यानंतर त्यांना आज पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. दादरच्या नायगाव पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित एका कार्यक्रमात त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह सर्व महत्वाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2018 07:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...