News18 Lokmat

...म्हणून सुबोध भावेनं पहिल्यांदा डोळ्यात लेन्स लावली

ज्येष्ठ अभिनेते काशिनाथ घाणेकर यांचे डोळे वेधक होते. त्यासाठी सुबोधनं लेन्सेस वापरलेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2018 04:04 PM IST

...म्हणून सुबोध भावेनं पहिल्यांदा डोळ्यात लेन्स लावली

मुंबई, 15 सप्टेंबर : नोव्हेंबरमध्ये 'आणि काशिनाथ घाणेकर' रिलीज होतोय. त्याचं प्रमोशनही टप्प्याटप्प्यानं सुरू होतंय. सिनेमाचे एक एक पैलू सोशल मीडियावर दिसतायत. सुबोध भावे, सुमित राघवन आणि सोनाली कुलकर्णीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता सुबोधनंही नवं फेसबुकवर पोस्ट केलंय.

ज्येष्ठ अभिनेते काशिनाथ घाणेकर यांचे डोळे वेधक होते. त्यासाठी सुबोधनं लेन्सेस वापरलेत. फेसबुकवर सुबोध लिहितो, मला लेन्स लावायची नेहमीच भीती वाटायची. पण विक्रम गायकवाडांच्या सल्ल्यावरून सुबोधनं त्या लावल्यात आणि त्याचा लूकच बदललाय.

सुबोध या सिनेमाबद्दल म्हणतो, 'काशिनाथ घाणेकर साकारणं सोपं नव्हतं. माझे आणि त्यांचे विचारही पूर्ण वेगळे आहेत. आमची व्यक्तिमत्त्वही वेगळी आहेत.बालगंधर्व, लोकमान्य साकारताना विचारांशी कुठे तरी साम्य होतं. पण इथे असं काहीच नव्हतं.' सुबोध म्हणतो, 'बघ ना, नुसत्या त्यांच्या नावावर नाटक हाऊसफुल होत होतं. मला असा अनुभव कधीच आलेला नाही.' अर्थात, सुबोध सगळं श्रेय दिग्दर्शक अभिजीत देशपांडेला देतो. त्यानं सिनेमा चांगला लिहिलाय.

आपलं आयुष्य सफल झालं असं वाटण्याच्या काही गोष्टी असतात.. त्यापैकी ही एक.. सुलोचना दीदींची भूमिका. सोनाली कुलकर्णीनं आपल्या इन्स्ट्राग्रामवर ही पोस्ट टाकलीय. आणि सुलोचना दीदींची भूमिका सोनाली साकारतेय, हे समोर आलं.

Loading...

'आणि काशिनाथ घाणेकर' सिनेमा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. या सिनेमातला एकेक लुक समोर येतोय. सुमित राघवनचा श्रीराम लागूंचा लुक सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा लुक समोर आलाय. सोनाली या सिनेमात सुलोचना दीदींची भूमिका साकारतेय.

मुकेश अंबानींच्या गणपतीला बाॅलिवूड सितारे हजर, पहा फोटोज्

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2018 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...