सोलापूर, 03 जुलै : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सपशेल पराभव स्विकारावा लागलाय. काँग्रेसचे माजी आमदार आणि सुभाष देशमुखांचे कट्टर प्रतिस्पर्धी दिलीप माने यांनी देशमुखांना धोबीपछाड देत आपणच बाजार समितीचे किंग असल्याचे सिद्ध केलंय.
मुंबईच्या देवदुताला रेल्वेचा सलाम, चंद्रशेखर सावंत यांना 5 लाखांचं बक्षीस
भाजपतील दोन देशमुखांच्या भांडणाचा फायदा काँग्रेसच्या दिलीप माने यांनी घेतल्याचं पाहायला मिळालेय. महत्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्रात पहिल्यांदाच बाजार समिती संचालक पदासाठी संविधानिक पद्धतीने निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे पालकमंत्री गटाने १८ पैकी १३ जागांवर आपला शिक्कामोर्तब केलाय. तर व्यापारी मतदारसंघातून दोन्ही जागा काँग्रेस समर्थकांकाडे गेलीय तर हमाल तोलार मतदारसंघाचीही जागा काँग्रेस समर्थकाकडे गेलीय.
रेणुका शहाणेला मुंबईची काळजी पण लोकांनी म्हटलं 'काँग्रेसवाली', ट्विटरवर ट्रोल
त्यामुळे सहकारमंत्री गटाचे होटगी आणि कंदलगाव या दोन गटातच समाधान मानावे लागेल. या निवडणुकीतील पराभवामुळे सहकारमंत्र्यांचे अस्तित्व पणाला लागले होते. या निकालामुळे भाजपला ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांनी नाकारल्याचे पाहायला मिळालाय.