वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी !- सुभाष देशमुख

वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी !- सुभाष देशमुख

कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफी मिळण्याची आशा निर्माण झालीय. कोणत्याही कारणास्तव कर्जमाफीचा अर्ज भरू शकलेल्या शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधकांकडे अर्ज द्यावा, असं आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय.

  • Share this:

31 जानेवारी, सोलापूर : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफी मिळण्याची आशा निर्माण झालीय. कोणत्याही कारणास्तव कर्जमाफीचा अर्ज भरू शकलेल्या शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधकांकडे अर्ज द्यावा, असं आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलंय. कर्जमाफीसाठी पात्र असलेला एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना स्पष्ट केलंय.

दरम्यान, राज्यात अजूनही शेकडो शेतकऱ्यांना तांत्रिक कारणास्तव कर्जमाफीपासून वंचित राहावं लागलेलं आहे. त्यांच्याबाबत शासन नेमकं काय निर्णय घेणार आहे. याबाबत मात्र, अद्याप सरकारकडून कोणतंच स्पष्टीकरण दिलं जात नाहीये, अशातच सहकार मंत्र्यांनी कर्जमाफीसाठी वंचित शेतकऱ्यांना पुन्हा बँकांकडे पुन्हा अर्ज भरण्याचं आवाहन केलंय, यावरून प्रशासकीय पातळीवर अजूनही कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा घोळ सुरूच असल्याचं स्पष्ट होतंय. पण यानिमित्ताने का होईना पण वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. हीच काय ती दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल.

First published: January 31, 2018, 4:51 PM IST

ताज्या बातम्या