मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /या पोपटाचा जबर स्टंट पाहून डोळे विस्फारतील, पण मालकाच्या त्या कृत्यामुळे संतापले नेटकरी, VIDEO

या पोपटाचा जबर स्टंट पाहून डोळे विस्फारतील, पण मालकाच्या त्या कृत्यामुळे संतापले नेटकरी, VIDEO

पोपटाचा जबर स्टंट पाहून डोळे विस्फारतील

पोपटाचा जबर स्टंट पाहून डोळे विस्फारतील

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन रंगीबेरंगी पोपट दिसतील. पुढच्याच क्षणी पिवळ्या रंगाचा पोपट डोक्यावर उभा राहून अनोखा स्टंट करतो

नवी दिल्ली 26 मे : माणसांनी शिकवलेली वाक्यं बोलणाऱ्या पोपटाशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. त्यापैकी काही व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण तुम्ही कधी पोपटाला स्टंट करताना पाहिलं आहे का? तेही एखाद्या फिल्मी हिरोसारखं. हे वाचून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण व्हायरल व्हिडिओमध्ये पोपट जे काही करताना दिसत आहे, ते पाहून तुमचीही अशीच प्रतिक्रिया येऊ शकते. मात्र, पोपटाच्या या स्टंटमागे एक कारण आहे, ज्याबद्दल युजर्समध्ये नाराजी आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन रंगीबेरंगी पोपट दिसतील. पुढच्याच क्षणी पिवळ्या रंगाचा पोपट डोक्यावर उभा राहून अनोखा स्टंट करतो. हे पाहून तुम्हीही म्हणाल - त्याने कमाल केली आहे. पण जेव्हा तुम्ही लक्ष द्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही पक्षी अन्न मिळावं म्हणून हे सगळं करत आहेत. याचं लोकांना खूप वाईट वाटलं. कॅमेऱ्यामागील व्यक्ती पक्ष्यांच्या असहायतेचा फायदा घेत असल्याचं लोकांचं मत आहे.

स्टंट करणाऱ्या पोपटाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @animalsquare_09 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांची ही क्लिप 2.6 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केली आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी टाकले आहेत. मात्र काही लोक हा व्हिडिओ पाहून संतापले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Jay (@animalsquare_09)

एका यूजरने लिहिलं आहे की, त्यांच्या असहायतेचं दुःख पाहा. बिचारे अन्नासाठी स्टंटबाजी करत आहेत. दुसरा वापरकर्ता म्हणतो, आता यांनाही स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करावं लागत आहे. आणखी एका यूजरने कमेंट केली आहे की, हा दुसरा पोपट माझ्या लहान भावासारखा आहे. दिदीला जे मिळालं ते सगळं त्यालाही पाहिजे, पण मेहनत दीदीच करेल. इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Stunt video, Videos viral