'हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या नाहीतर आत्महत्या करेन'

'हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या नाहीतर आत्महत्या करेन'

इमारतीच्या गच्चीवर चढलेल्या पदवीधर विद्यार्थ्याने हैदराबाद प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली.

  • Share this:

हैदराबाद, 01 डिसेंबर : हैदराबाद (तेलंगणा) येथे महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कारानंतर जाळल्याप्रकरणी देशभरात संताप उठला आहे. विविध शहरांमधील लोक या प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करत आहेत. दरम्यान, रविवारी तेलंगणाच्या खम्मम येथील विद्यार्थ्याने इमारतीच्या छतावर चढून आरोपींनी फाशीची शिक्षा द्या नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली आहे.  गच्चीवरून उडी मारण्याची धमकी तरुणाने दिल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

इमारतीच्या गच्चीवर चढलेल्या पदवीधर विद्यार्थ्याने हैदराबाद प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली. असं झालं नाही तर तो छतावरून उडी घेऊन आत्महत्या करेल अशी धमकी त्याने दिली. या सगळ्यामुळे इमारतीच्या खाली लोकांची गर्दी झाली आहे. याबद्दल स्थानिकांकडून पोलिसांना कळविण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी विद्यार्थ्याला समजावून छतावरून खाली घेतलं आणि शांत  केलं. त्याचे समुपदेशन केल्यानंतर त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरणी टायर मेकॅनिकचा धडधडीत पुरावा, 48 तासांत आरोपींचा गेम ओव्हर

सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी पोलिसांकडून धक्कादायक पुरावे आणि बाबी समोर आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. त्यामुळे एका टायर मेकॅनिकने दिलेल्या छोट्याशा माहितीनंतर 48 तासांमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींना कसं अटक केलं याची माहिती माध्यमांना दिली आहे.

इतर बातम्या - काँग्रेसच्या रॅलीमध्ये प्रियंका चोप्राच्या नावाने घोषणा, पाहा व्हायरल VIDEO

1. महिला डॉक्टरच्या बहिणीने पोलिसांना सांगितले की तिच्या बहिणीच्या स्कूटीचा टायर पंक्चर झाला होता, त्यामुळे ती टोल प्लाझाजवळ अडकली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम टोल प्लाझाजवळ टायर मेकॅनिकचा शोध सुरू केला. पोलिस मेकॅनिकजवळ पोहोचताच त्याने सांगितले की एक लाल रंगाचा स्कूटी त्याच्याकडे आली होती. इतकंच नाही तर ज्याने स्कूटी आणली तो रस्त्याच्या उलट्या बाजूने आला असल्याचेही सांगितले.

2. पोलिसांना रस्त्याच्या दुतर्फा एक कारखाना आढळला, जेथे बाहेर सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. तत्काळ या फुटेजची पाहणी करण्यात आली. हे दोन्ही आरोपी स्कूटीसह पुढे जात असल्याचे दिसून आले. दुसर्‍या फुटेजमध्ये बराच वेळ एक ट्रक उभा असल्याचे दिसून आले, परंतु अंधारामुळे ट्रकचा नंबर समजू शकला नाही.

3.  पोलिसांनी हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज 6 ते 7 तास मागे करून पाहिल्यानंतर लक्षात आले की दिवसभर हा ट्रक तेथे उभा होता. ट्रकचा नंबर मिळताच पोलिसांनी त्याच्या मालकाचा शोध सुरू केला. त्याचा मालक श्रीनिवास रेड्डी असून त्याच्याकडे 15 ट्रक आहेत.

इतर बातम्या - पवारांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांची हवा, लेकीला थेट हेलिकॉप्टरने धाडलं सासरी!

4. ट्रक मालकाला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. स्कूटी घेऊन फिरत असलेल्या संशयितास तो ओळखू शकला नाही. पण मालकाने नक्कीच सांगितले की मोहम्मद आरिफ नावाचा चालक ट्रक चालवितो.

5. या दरम्यान, पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने जवळील पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरवात केली. इथे पुन्हा तोच संशयित व्यक्ती स्कूटीला मेकॅनिककडे घेऊन जात होता. हा माणूस इथल्या बाटलीत पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं.

6. पोलिस पथकाने मोबाइल टॉवरच्या स्थानावरून आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी ट्रक चालक आरिफलाही फोन केला, ज्याचा नंबर त्याच्या मालकाने दिला होता. या दोघांच्या माहितीच्या आधारे पोलिसांची टीम आरोपींकडे पोहोचली.

इतर बातम्या - निर्दयी! 6 वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या, शाळेच्या बेल्टने आवळला गळा

7. दरम्यान, टोल प्लाझापासून सुमारे 30 कि.मी. अंतरावर एका शेतकऱ्याने पोलिसांना कळवले की त्याला एक जळलेला मृतदेह दिसला. हरवलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी डॉक्टरांच्या कुटुंबियांना घटनास्थळी बोलावले. डार्क स्कार्फ आणि सोन्याच्या पेंडेंटसह डॉक्टर महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या