रोज जीवाची बाजी लावून शाळेत जातात, या विद्यार्थ्यांचा प्रवास पाहून धक्का बसेल

एसटी बसच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करीत असल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 10:44 AM IST

रोज जीवाची बाजी लावून शाळेत जातात, या विद्यार्थ्यांचा प्रवास पाहून धक्का बसेल

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलडाणा, 09 जुलै : खामगाव तालुक्यातील शाळेचे विदयार्थी बसमध्ये जागा नसल्यामुळे चक्क एसटी बसच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करीत असल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा गंभीर प्रकार जिल्ह्यातील खामगाव ते कवळगाव रस्त्यावरील असून हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने मोबाईलमध्ये काढला आहे. ज्या बसवरून या विद्यार्थ्यांनी हा जीवघेणा प्रवास केला ती बस खामगाव आगाराची असल्याचं समोर आलं आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आगाराची बस क्रमांक एम 40 एन 9666 ही बस सकाळी खामगाव वरून कवळगावला गेलेली होती. मात्र, परत खामगावला येताना रस्त्यातील काळेगाव फाट्यावर बस पूर्णपणे भरल्याने गाडीत बसायला जागा नसल्याने शाळकरी विद्यार्थी हे चक्क बसच्या टपावर बसले आणि तेथूनच विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू झाला. जवळपास 30 किमीच्या वर या विद्यार्थ्यांनी हा जीवघेणा प्रवास केला.

या बसमध्ये जवळपास 75 ते 80 प्रवाशी प्रवास करीत होते. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने या गंभीर प्रकारचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. आणि हा प्रकार समोर आला आहे. मात्र, या चिमुकल्या विद्यार्थ्यांबद्दल बसच्या चालक-वाहकाला काहीच कसं वाटलं नाही? जर का काही अनुचित घटना घडली असती तर याची जबाबदारी कोणी घेतली असती?  असा प्रश्न या उपस्थित होतो.

Loading...

यासंदभार्त खामगाव आगाराचे आगार व्यवस्थापक यांना विचारलं असता त्यानी चौकशी करून चालक-वाहकांवर नियमानुसार कारवाई करणार असलयाचं सांगितलं आहे.  पण कारवाई झाली तरी विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस सेवा अपूरी पडत आहे हे प्रशासनाच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे. एकीकडे बेस्टसारख्या बस रिकाम्या धावतात म्हणून त्यांच भाडं कमी करण्यात आलं. पण गावोगावी अशा जीवाशी खेळणाऱ्यांची काही किंमत आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

VIDEO: खासदार इम्तियाज जलील अडचणीत, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...