'SORRY आई...मी जात आहे...माझं कोणत्याही मुलीशी प्रेम प्रकरण नाही'

'SORRY आई...मी जात आहे...माझं कोणत्याही मुलीशी प्रेम प्रकरण नाही'

हे ते शब्द आहेत जे आत्महत्या करण्याआधी लिहण्यात आले आहेत. एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्यावेळी हे शब्द आईला लिहलं आहे.

  • Share this:

लखनौ, 30 सप्टेंबर : 'सॉरी आई…मी जात आहे…माझं कोणत्याही मुलीशी प्रेम प्रकरण नाही' हे ते शब्द आहेत जे आत्महत्या करण्याआधी लिहण्यात आले आहेत. एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्यावेळी हे शब्द आईला लिहलं आहे. भानु प्रताप सिंह असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी भानुचा मोबाइल ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे, घरातल्या लहान मुलाला गमावल्यामुळे भानूच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानू प्रताप सीतापूर रोडवरील एका खासगी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचा डिप्लोमा शिकत होता. शुक्रवारी भानू महाविद्यालयात गेला नसल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं. दुपारी बराच वेळ तो खोलीतून बाहेर पडला नाही. तेव्हा त्याच्या बहिणीने त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यानंतरही जेव्हा उत्तर मिळाला नाही तेव्हा कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा तोडला.

इतर बातम्या - राष्ट्रवादीला मोठा धक्का, तिकीट दिलेल्या महिला उमेदवार करणार भाजपमध्ये प्रवेश

शवविच्छेदन अहवालानुसार आत्महत्या झाल्याचं स्पष्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिण जेव्हा गच्चीवर गेली आणि भानूच्या खोलीचा दरवाजा उघडली तेव्हा तिला धक्काच बसला. भानूचा मृतदेह पंख्यावर लटकला होता. गळफास लावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात समोर आलं. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली. ज्यात भानूने आईला सॉरी म्हणत माझं कोणत्याही मुलीवर प्रेम नसल्याचं म्हटलं आहे. लखनौच्या जानकीपुरम इथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

इतर बातम्या - BREAKING: जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीने तरुणाला चिरडलं, जागीच मृत्यू

गेल्या अनेक दिवसांपासून भानू तणावात होता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटच्या संदर्भात कुटूंबाकडे चौकशी केली असता मुलीशी असलेल्या नात्याबद्दल त्याने का लिहिले आहे हे कोणालाही समजू शकत नाही. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, काही कारणामुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होता. पण त्याच्या तणावाचं खरं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही.

इतर बातम्या - घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना बाहेर 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 01:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading