आग्र्याच्या डॉ. आंबेडकर विद्यापीठाचा सावळा गोंधळ, मार्कशीटवर लावला सलमानचा फोटो

आग्र्याच्या डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा एक सावळा गोंधळ समोर आला आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने त्याच्या मार्कशीटवर त्याचा स्वत:चा फोटो लावण्याऐवजी अभिनेता सलमान खानचा पासपोर्ट साइज फोटो लावला.बरं इतकंच नाही हा 'हुशार' विद्यार्थी परीक्षेत 35%नी पाससुद्धा झाला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Nov 22, 2017 01:49 PM IST

आग्र्याच्या डॉ. आंबेडकर विद्यापीठाचा सावळा गोंधळ, मार्कशीटवर लावला सलमानचा फोटो

22 नोव्हेंबर : आग्र्याच्या डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा एक सावळा गोंधळ समोर आला आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने त्याच्या मार्कशीटवर त्याचा स्वत:चा फोटो लावण्याऐवजी अभिनेता सलमान खानचा पासपोर्ट साइज फोटो लावला.बरं इतकंच नाही हा 'हुशार' विद्यार्थी परीक्षेत 35%नी पाससुद्धा झाला आहे. हे प्रकरण अलिगढच्या अमृता सिंग मेमोरियल डिग्री महाविद्यालयात घडलं आहे.

या घटनेबाबत तेव्हा लक्षात आलं जेव्हा विद्यार्थ्यांना मार्कशीट देण्याआधी त्याची तपासणी केली गेली. मजेशीर गोष्ट तर अशी की एका दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या मार्कशीटवर राहुल गांधींचा फोटो लावला आहे. तर एका विद्यार्थ्याने त्याच्या मार्कशीटवर भीमराव आंबेडकर यांचंच नाव लिहिलं आहे.

आजकालची ही वात्रट मुलं असा प्रकार करत असतात आणि असे प्रकार घडणं हे काही नवीन नाही. पण त्यांच्या या चुका शिक्षकांच्याही लक्षात न याव्या म्हणजे गंभीर आहे. अशा चुका करणारी ही सगळी विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्णही झाली आहेत.

काय गंमत आहे ना आता याच मार्कशीटच्या आधारावर या मुलांचं भविष्य आहे, त्यांचं करिअर आहे. पण आपला हा गंभीर हलगर्जीपणा लपविण्यासाठी विद्यापीठाचे पीआरओ जी.एस शर्मा यांनी आम्ही असं काही केलंच नाही अशी कबुली दिली आहे. पण आता ते सत्य आहे बाहेर तर येणारच.

त्यामुळे असा गंभीर प्रकार कसा घडला आणि आता निकालात काही फेरबदल करणार का हेच बघणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close