नवी दिल्ली, 18 मे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू कसा होतो हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आलं आहे. रिशी जोशुआ असं विद्यार्थ्याचं नाव असून तो एम.ए सेकंड इअरचा विद्यार्थी होता. त्यानं खोलीतील पंख्याला फाशी घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यानं आत्महत्या करत असल्याचा मेल आपल्या प्राध्यापकांना पाठवला.
काही काळ मी मृत्यूच्या भौतिक स्थितीबद्दल जाणून घेऊ इच्छितो. ज्यावेळी तुम्हाला हा मेल मिळालेला असेल तेव्हा मी त्या अवस्थेमध्ये नसेन. माझ्या नातेवाईकांची काळजी घ्या. असं जोशुआनं आपल्या मेलमध्ये म्हटलं आहे. रिशी जोशुआ हा हॉस्टेलमध्ये राहायला होता. दरम्यान वॉर्डननं दिलेल्या माहितीनंतर लगेचच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
गँगरेप प्रकरणातील आरोपीला ठेचून मारले
पंख्याला लटकला होता मृतदेह
ज्यावेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाली तेव्हा जोशुआचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी सर्वप्रथम खिडकीतून सारी परिस्थिती ध्यानात घेतली. त्यानंतर कटरनं केबल कापून मृतदेह खाली उतरवला गेला. त्यानंतर रूग्णालयात मृतदेह पाठवत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना याबद्दलची माहिती दिली गेली. यामध्ये कोणत्याही घातपाताची शक्यता नाही. यामध्ये प्रेम प्रकरणाचा तर संबंध नाही ना? याबद्दल देखील पोलिस आता चौकशी करत आहेत. मागील काही दिवसांपासून जोशुआ गायब होता असा दावा काही विद्यार्थ्यांनी केला. पण, पोलिसांनी मात्र चौकशीअंती सारे दावे फेटाळून लावले आहे. विद्यार्थ्याचे आई – वडिल आल्यानंतर पुढील चौकशी तसेच पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
SPECIAL REPORT: थर्मोकॉल, प्लास्टिक प्लेटला 'क्लायमेट स्मार्ट' पत्रावळीचा पर्याय