दोन्ही पायाने अपंग असूनही अख्खा देशाचा पोशिंदा झाला, वाचा तरुणाची Success स्टोरी

दोन्ही पायाने अपंग असूनही अख्खा देशाचा पोशिंदा झाला, वाचा तरुणाची Success स्टोरी

रुपेश हे दोन्ही पायाने अपंग असूनसुद्धा केवळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी सुधारित शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे.

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

रत्नागिरी, 20 डिसेंबर : कोकणातील अनेक तरुण नोकरीच्या शोधात पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जातात. हाताला मिळेल ते काम करतात. त्यामुळे अनेकांची गावाकडची शेती ओस पडू लागली आहे . मात्र, याला  अपवाद ठरलेत अतिदुर्गम विन्हे गावातील रुपेश पवार. रुपेश हे दोन्ही पायाने अपंग असूनसुद्धा केवळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी सुधारित शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे. आपल्या सुधारित शेतीतून रुपेश पवार यांनी समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे.

कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. त्यातच वयोवृद्ध आई, वडिलांचा अकाली मृत्यू मोठी बहिण  घटस्फोटित त्यामुळे तीसुद्धा माहेरीच असते. अशा परिस्थितीत कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी दोन्ही पायांनी अपंग असलेल्या रुपेश पवार यांच्यावर येऊन पडली. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, जीवन जगायचे कसे असा प्रश्न पवार कुटुंबियांना भेडसावू लागला.

यावर मात करण्यासाठी रुपेश पवार यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेती हाच पर्याय निवडला. आपल्या वडिलोपार्जित जमिनीत शेती करण्याचा निर्णय घेतला. अतिशय कठीण परिस्थितीत त्याने मोठ्या कष्ठाने शेती केली. समाजामध्ये अनेक सुदृढ तरुण व्यसनाधीनता व दिशाहीन होऊन भटकताना आपण पाहतो. पण, रुपेश पवार यांनी चक्क अपंगत्वावर मात करून शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या - बॉस म्हणाला- माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव, वैतागून कर्मचाऱ्याची आत्महत्या

आपण अपंग असलो तरीही काहीतरी करण्याची जिद्द असल्याचं त्यांनी आपल्या शेतीतून समाजाला दाखवून दिलं आहे. दोन्ही पायाने अपंग असूनसुद्धा रुपेश पवार पारंपरिक शेतीत मोठ्या मेहनतीने सुधारित शेती करून दोन कुटुंबाचा आधारवड बनला आहे.

शेती अभ्यास प्रत्यक्ष शेतात उतरवला

आपल्यावर आलेल्या संकटाची तमा न बाळगता, खचून अगतिक न होता, जीवनाचा आनंद अधिक फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न रुपेश यांनी करून दाखवला आहे. शेती अभ्यास, आधुनिकतेची कास आणि यांत्रिकीकरणाची साथ याच्या आधारे प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. लहानपणी पोलिओ झाल्याने दोन्ही पायांनी अपंगत्व आलं.

प्राथमिक शिक्षण गावातीलच मराठी शाळेत तर दहावीपर्यंत शिक्षण दाभोळ इथे अण्णा शिरगावकरांच्या सागरपुत्र वसतिगृहात पूर्ण केले. घरातील माणसं व मित्रमंडळी उचलून शाळेत न्हायची. शेतीचे सगळे तंत्र, मंत्र शिकण्यासाठी पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय गाठलं. कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शेतीविषयक मासिके वाचून शेती अभ्यास सुरू केला.

इतर बातम्या - CAA च्या विरोधात उत्तर प्रदेश पेटलं; दिल्लीत जामा मशीद परिसरात तणाव

कृषी प्रदर्शन, किसान गप्पा गोष्टी, चर्चासत्र, ट्रेनिंग घेतलं. चारसूत्री पद्धतीने भात लागवड व सेंद्रिय खतांचा वापर करून भातपिक स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. शेतात वीज नसल्याने 50 टक्के अनुदानावर पंचायत समितीतून डिझेल पंप घेत कलिंगड, काकडी, भेंडी, घेवडी, चवळी, बिट, मुळा, पालक, मेथी, मटार याचंही उत्पादन घेतलं.

स्वतः कुंबळे व लाटवन बाजारपेठ येथे विक्री केली. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यामुळे आर्थिक लाभ झाला. अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, घरच्यांची आणि नातेवाईकांची साथ, मदत यामुळे रुपेश यांनी आपलं अपंगत्व नाहीसं करून कर्तृत्व सिद्ध केलं.

इतर बातम्या - IPL Auctionमध्ये ‘या’ मिस्ट्री गर्लनं लावली कोट्यावधींची बोली, नेटकरीही फिदा

स्पर्धा, पुरस्कारांवर छाप, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

रुपेश पवार यांच्या कर्तृत्वाची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पशुसंवर्धन विभागाचा 2017 सन्मान, नूतन गुळगुळे फाऊंडेशनचा 2018 ध्येयपूर्ती पुरस्कार. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान, कृषी महोत्सव 2019, जिल्हास्तरीय भातपिक स्पर्धा, विशेष उल्लेखनीय कृषी प्रगतीसाठी सन्मानित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading