Home /News /news /

शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम; शॉर्ट टर्ममध्ये कमाईची संधी; तज्ज्ञांची 'या' शेअर्सवर BUY रेटिंग

शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम; शॉर्ट टर्ममध्ये कमाईची संधी; तज्ज्ञांची 'या' शेअर्सवर BUY रेटिंग

शेअर बाजार 3 महिन्यांच्या उच्च पातळीवर बंद झाला. Sensex देखील आज 86 अंकांनी वधारला आणि 61,309 वर बंद झाला. आज बँक निफ्टीमध्ये थोडीशी घसरण झालेली दिसली आणि तो 154 अंकांनी घसरून 38,216 वर बंद झाला.

    मुंबई, 17 जानेवारी : शेअर बाजाराने आज आठवड्याची चांगली सुरुवात केली आहे. हेवीवेट स्टॉक्सच्या जोरावर आज निफ्टी 18300 च्या पुढे जाताना दिसला. ब्रॉडर मार्केटनेही चांगली कामगिरी केली. दिग्गज शेअर्सपेक्षा स्मॉल-कॅप शेअर अधिक चमकले, ज्यामुळे स्मॉलकॅप इंडेक्स आज विक्रमी उच्चांकावर बंद झाला. Auto, Power, Realty शेअर्समध्ये खरेदी झाली. Banking, Pharma, शेअर मात्र दबावाखाली दिसले. बाजार 3 महिन्यांच्या उच्च पातळीवर बंद झाला. Sensex देखील आज 86 अंकांनी वधारला आणि 61,309 वर बंद झाला. आज बँक निफ्टीमध्ये थोडीशी घसरण झालेली दिसली आणि तो 154 अंकांनी घसरून 38,216 वर बंद झाला. मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. स्मॉलकॅप इंडेक्स विक्रमी पातळीवर बंद झाला, तर ऑटो, पॉवर आणि रियल्टी शेअरमध्ये चांगली खरेदी झाली. ऑटो इंडेक्सही दोन महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाला. बाजाराच्या भविष्यातील वाटचालीबद्दल बोलतांना, HDFC सिक्युरिटीचे नागराज शेट्टी सांगतात की, निफ्टी गेल्या 3 आठवड्यांपासून वीकली चार्टवर (Weekly Chart) सतत लांबलचक बुल कँडल तयार करत आहे. निफ्टीने आतापर्यंत बरीच वाढ केली असली, तरी नजीकच्या काळात निफ्टीची तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. प्रत्येक घसरणीवर खरेदी होताना दिसत आहे, त्या आधारावर असे म्हणता येईल की पुढील आठवड्यापर्यंत निफ्टी 18600 ची पातळी सहज पाहू शकेल. निफ्टीला इमिडिएट सपोर्ट 18100 वर आहे. Metro Brands शेअरमध्ये 20 टक्क्यांची उसळी, Rakesh Jhunjhunwala यांच्याकडेही शेअर्स दिग्गजांचे 10 सुचवलेले स्टॉक सांगत आहोत, ज्यामध्ये 3-4 आठवड्यांत मजबूत कमाई होऊ शकते. Kotak Securities चे श्रीकांत चौहान यांचा गुंतवणुकीचा सल्ला IRCTC: BUY | LTP: 902.70 रुपये या स्टॉकमध्ये 845 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी कॉल असेल आणि 1000 रुपयांचे टार्गेट असेल. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 11-15 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. Info Edge : BUY | LTP: 5,696.25 रुपये या शेअरमध्ये 5,500 च्या स्टॉप लॉससह 5,950-6,050 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीची शिफारस देण्यात आली आहे. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 4.5-6.2 टक्के परतावा देऊ शकतो. Infosys : BUY | LTP: 1929.35 रुपये या शेअरमध्ये 1850 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला देण्यात आला असून टार्गेट 2,000-2,100 रुपयांचे असेल. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 3.6-8.8 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. Multibagger Share : मस्तच! 'हा' स्टॉक ठरला मल्टिबॅगर; एक लाख रुपयांचे झाले 15 लाख HDFC Securities चे सुभाष गंगाधर यांचा गुंतवणुकीचा सल्ला Jubilant Ingrevia | Buy | LTP: 635.90 रुपये या शेअरमध्ये 580 च्या स्टॉप लॉससह 750 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक 3-4 आठवड्यात 18 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. Jindal Steel & Power | BUY | LTP: 418.65 रुपये या शेअरमध्ये 390 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करुन 475 रुपयांचे टार्गेट आहे. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 13.5 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. Mastek | BUY | LTP | 3184.5 रुपये या शेअरमध्ये 3,000 रुपयांच्या स्टॉप लॉससह 3,600 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीची शिफारस देण्यात आली आहे. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 13 टक्क्यांपर्यंत परतावा पाहू शकतो. 5paisa.com च्या रुचित जैन यांचा गुंतवणूक सल्ला Sobha : BUY | LTP: 913.7 रुपये या शेअरला 865 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करुन 988 रुपयांचे टार्गेट असेल. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 8 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. Electric Vehicle संबंधित शेअर तुमचा पोर्टफोलियो चमकवू शकतात, 'या' शेअर्सवर नजर ठेवा Gujarat Narmada Valley Fertilizers & Chemicals | BUY | LTP: 489.25 रुपये या शेअरमध्ये 530 रुपयांच्या टार्गेटसाठी 461 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 8 टक्क्यांपर्यंत परतावा पाहू शकतो. Bharat Electronics | BUY | LTP: 220.1 रुपये या शेअरमध्ये 208 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी कॉल असेल आणि 240 रुपयांचे टार्गेट असेल. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 9 टक्क्यांपर्यंत परतावा पाहू शकतो. Tata Consumer Products | BUY | LTP: 762.5 रुपये या शेअरमध्ये 727 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला असून 815 रुपयांचे टार्गेट आहे. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 7 टक्क्यांपर्यंत परतावा पाहू शकतो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या