कल्याण, डोंबिवलीपाठोपाठ मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात पुन्हा कडकडीत लॉकडाउन

कल्याण, डोंबिवलीपाठोपाठ मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात पुन्हा कडकडीत लॉकडाउन

समूह संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

बीड, 02 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. परंतु, अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ आता बीडमध्येही लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.

बीड शहरात सात दिवस पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. समूह संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात अनेक व्यक्ती आल्याने बीड शहरपुढील 7 दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत रात्री उशीरा तसे आदेश काढण्यात आले आहेत.

अकरावीची ऑनलाइन नोंदणी आजपासून, प्रवेशासाठी असा करा अर्ज

बुधवारी बीड शहरात कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळून आले होते. यातील एका रुग्णाने बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आले.

यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये यासाठी संपूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहल रेखावर यांनी घेतला आहे.

पुण्यात कोरोनाची परिस्थिती आणखी चिंताजनक, 24 तासातील रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर

राज्य सरकारकडून गेल्या 24 तासातील मिळालेल्या आकडेवारीनुसार, बीडमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 118 वर पोहोचली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 95 आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 इतकी आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,80,289 वर

दरम्यान, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. (Maharashtra covid 19 patient) गेल्या  24 तासांमध्ये तब्बल 5537 नव्या रुग्णांची वाढ झाली असून ही विक्रमी संख्या आहे.  त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1,80,289 वर गेली आहे. राज्यात आज 189 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 8053 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 2243 जण बरे होऊन घरी गेलेत. राज्याचा मृत्यू दर 4.47 एवढा झाला आहे. 79,095 एवढे Active रुग्ण आहेत.

मुंबईत एकूण रुग्ण  79145 रुग्ण आहेत.  त्यातले 29715 रुग्ण हे Active आहेत. शहरात आज 69 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 1487वर गेली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: July 2, 2020, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading