मनी लॉड्रिंग प्रकरणी चंदा कोचर यांची ईडीकडून पुन्हा चौकशी

मनी लॉड्रिंग प्रकरणी चंदा कोचर यांची ईडीकडून पुन्हा चौकशी

बँकेच्या सीईओ असताना पतीच्या कंपनीला फायदा व्हावा, म्हणून व्हिडिओकॉनला कर्ज दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 04 मार्च : ICICIच्या माजी सीईओ चंदा कोचर यांची 10 तासांपासून ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. पतीच्या कंपनीला फायदा करण्यासाठी पैशांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर लगावण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या 10 तासांपासून त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

या चौकशीचा आज तिसरा दिवस आहे. कोचर यांच्यावर पैशांची फेरफार केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. बँकेच्या सीईओ असताना पतीच्या कंपनीला फायदा व्हावा, म्हणून व्हिडिओकॉनला कर्ज दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

चंदा कोचर यांच्यावर नेमके काय आरोप आहेत पाहूयात..

- आयसीआयसी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू पॉवर कंपनीच्या कार्यालयांवर सीबीआयने धाड टाकली.

- व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज देताना चंदा कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितले आणि त्याचा फायदा घेतला असा त्यांच्यावर आरोप आहे. कर्ज वाटपात नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर चंदा कोचर यांना राजीनामा द्यावा लागला होता.

- चंदा कोचर यांच्या राजीनाम्यासोबत त्यांना 2009 पासून कंपनीने बोनसदेखील बँकेला परत करण्यास सांगितले. श्रीकृष्ण समितीने केलेल्या चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

- एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेत्या बातमीनुसार चंदा कोचर यांना तब्बल 350 कोटी रुपये चुकवावे लागतील. ईसॉपच्या माध्यमातून चंदा कोचर यांना 2009 पासून 342 कोटी रुपये आणि 10 कोटी रुपये बोनस मिळाला होता.

- बँकेने व्हिडीओकॉनला कर्ज देण्याच्या बदल्यात त्यांनी दीपक कोचर यांना मदत करावी, असा आरोप कोचर यांच्यावर आहे. कोचर आयसीआयसीच्या प्रमुख असताना व्हिडिओकॉनला 3 हजार 205 कोटीचे कर्ज मंजूर करण्यात आले होते.

चंदा कोचर यांची एक वेगळी ओळख

- भारतातील बँकिंग क्षेत्रात पुरुषांच्या वर्चस्वाला धक्का देत चंदा कोचर यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात एक प्रशिक्षणार्थी म्हणून केली होती.

- चंदा कोचर यांनी प्रशिक्षणार्थी ते ICICIच्या सीईओ पदापर्यंतचा प्रवास केला. इतकंच काय फोर्ब्सने त्य़ांचा समावेश जगातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत केला होता.

- 1982 मध्ये चंदा कोचर यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर 1984 मध्ये चंदा कोचर यांनी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून ICICI बँकेत कामाला सुरुवात करण्यात आली.

- ICICI चे 1994 मध्ये स्वायत्त संस्था झाली. तेव्हा चंदा कोचर यांची सहाय्यक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

- उप व्यवस्थापक, व्यवस्थापक असा प्रवास करत 2001 मध्ये चंदा कोचर बँकेच्या संचालक झाल्या. पुढे कोचर यांच्याकडे कार्पोरेट बिझनेसची जबाबदारी देण्यात आली.

- त्यानंतर चंदा कोचर चिफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून काम करू लागल्या. 2009 मध्ये चंदा कोचर यांना सीईओ आणि एमडी करण्यात आले.

कानठळ्या बसवणारा आवाज आणि सतत मारा, पाकच्या गोळीबाराचा VIDEO

First published: March 4, 2019, 11:50 PM IST

ताज्या बातम्या