S M L

कधीकाळी एका स्कूटरवरून फिरणारे मोदी-तोगडिया एकमेकांचे कट्टर विरोधक का बनले ?

सूत्रांच्या माहितीनुसार 2012सालांपासूनच मोदी आणि प्रवीण तोगडियांमध्ये वितुष्ठ निर्माण झाल्याचं बोललं जातंय. पण त्याची सुरूवात खरंतर 2003सालीच झाली होती. प्रवीण तोगडियांनी गुजरातमधील तत्कालीन मोदी सरकारच्या गृहखात्यात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप सुरू केला होता. नेमकी हीच बाब मोदींना आवडली नाही

Chandrakant Funde | Updated On: Apr 24, 2018 11:02 AM IST

कधीकाळी एका स्कूटरवरून फिरणारे मोदी-तोगडिया एकमेकांचे कट्टर विरोधक का बनले ?

चंद्रकांत फुंदे, डेप्युटी न्यूज एडिटर, न्यूज18 लोकमत

16 जानेवारी, नवी दिल्ली : विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही खरंतर कधीकाळी एकाच स्कूटरवरून गुजरातमध्ये संघाचा प्रचार करत फिरायचे पण आजमितीला या दोन्ही फायरब्रँड हिंदू नेत्यांमधून विस्तवही जात नाही, एवढच काय आज प्रवीण तोगडियांनी आपलं एन्काउंटर करण्याचा डाव होता, असा सनासनाटी आणि तितकाच गंभीर आरोप करून अप्रत्यक्षपणे थेट मोदी सरकारलाच टार्गेट केलंय. केंद्राच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत आपल्या डॉक्टरांना घाबरवलं जात असल्याचाही आरोप केलाय. आपला आवाज दाबण्यासाठी आपल्याला माहित नसलेल्याही जुन्या केसेस पुन्हा उकरून काढल्या जात असल्याचा गंभीर आरोप केंद्र सरकारवर केलाय. यावरून प्रवीण तोगडियांच्या टीकेचा थेट रोख हा मोदींच्या केंद्र सरकारविरोधातच असल्याचं एव्हाना स्पष्ट झालंय. पण मुळात मुद्दा असा आहे की, या दोन्ही नेत्यांमध्ये एवढं वितुष्ठ येण्याची कारणं तरी काय आहेत ? हेही जाणून घेतलं पाहिजे.

सूत्रांच्या माहितीनुसार 2012सालांपासूनच मोदी आणि प्रवीण तोगडियांमध्ये वितुष्ठ निर्माण झाल्याचं बोललं जातंय. पण त्याची सुरूवात खरंतर 2003सालीच झाली होती. प्रवीण तोगडियांनी गुजरातमधील तत्कालीन मोदी सरकारच्या गृहखात्यात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप सुरू केला होता. नेमकी हीच बाब मोदींना आवडली नाही त्याचाच परिपाक म्हणून मोदींनी तोगडियांचे समर्थक गोरधन झडफिया यांना मंत्रिमंडळातून वगळलं. तोगडिया समर्थक असलेले हे झडफिया 2007साली शंकरसिंह वाघेला यांना जाऊन मिळाल्याने मोदी आणि तोगडिया यांच्यातला वाढत गेला. अशातच तोडगियांना प्रक्षोभक भाषणांचा धडाका लावत गुजरातमधील युवकांना त्रिशूल वाटपांचा कार्यक्रम हाती घेतल्याने तत्कालीन मोदी सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढली.

पुढे 2012साली तर तोगडियांनी उघड उघड मोदींच्या भाजपविरोधात प्रचाराचा धडाका सुरू केल्याने मोदींनी त्यांच्यासोबतचे संबंध पूर्णपणे तोडून टाकले तर इकडे तोगडियांनी स्वतःला विश्व हिंदू परिषदेचा आंतराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करत स्वतःची वेगळी चूल मांडली पण मुळातच हे दोघेही फायरब्रँड नेते असल्याने तसंही एक म्यान में दो तलवारी रहँ नकी सकती या म्हणीप्रमाणे परस्परांपासून दूर राहणंच पसंत करू लागलेत. तसंही मोदींना अमित शहांसारखा खंदा जोडीदार मिळाल्याने त्यांना आता प्रवीण तोगडियांच्या मदतीची गरज राहिली नव्हती.

दरम्यानच्या काळातच प्रवीण तोगडियांचा भडखाऊ भाषणांचा सिलसिला सुरूच होता. मग पुढे 2014साली मोदी देशाचे पंतप्रधान बनले आणि साहजिकच सगळीकडेच त्यांच्या नावाचा दबदबा वाढू लागला तर प्रवीण तोगडिया फक्त प्रक्षोभक भाषणांपुरते उरले. याच कारणामुळे त्यांच्याविरोधात देशभरात ठिकठिकाणी केसेस दाखल झाल्या. राजस्थानातली केसही त्यापैकीच एक म्हणावी लागेल. कोर्टाने वारंवार आदेश काढून प्रवीण तोगडिया सुनावणीला हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघालं. पुढे आजचा हा सगळा ड्रामा झाला.

सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी आणि संघाला आता प्रवीण तोगडियांना देखील अडवाणींप्रमाणेच विश्व हिंदु परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवायचं आहे किंबहुना त्यासाठीच संघ परिवाराकडून भुवनेश्वरच्या बैठकीचं आयोजन केलं गेलं होतं. पण विहिंपचं अध्यक्षपद सोडायला तोगडियांना साफ नकार दिलाय. त्यातूनच पुढचं सगळं रामायण घडल्याचं बोललं जातंय. त्यामुळे कधीकाळी एका स्कूटरवरून फिरणाऱ्या या दोन हिंदुत्ववादी मित्रांमधलं वितुष्ठ आणखी कुठल्या थराला जातंय. हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2018 12:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close