आता खिशात परवाना नसेल तरीही पावती न फाडता...!

आता खिशात परवाना नसेल तरीही पावती न फाडता...!

वाहतूकीच्या नियमांच उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे आपला परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज पडणार नाहीये.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : वाहतूकीच्या नियमांच उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे आपला परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज पडणार नाहीये. आता तुमच्या मोबाईलमध्ये असणारी कागदपत्रांची ई- कॉ़पी पुरेशी असणार आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश दिलाय. त्यामुळे आता तुमचे मूळ कागदपत्र घेऊन फिरण्याची गरज नाही.

अनेकदा आपण घाईघाईत घरातून निघतो आणि आपली कागदपत्र घरीच राहतात. मग अशा वेळेस पोलिसांनी पकडलं की पंचायत होते. त्याच्या चांगलाच भुर्दंड द्यावा लागतो. पण यावर आता उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या परवाण्यांची आणि सगळ्या कागदपत्रांचे फोटो फोनमध्ये सेव्ह करा. कारण आता ते ई-फोटोही पुरेशे आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व वाहतूकदारांकडून स्वागत होत आहे.

माहिती तंत्रज्ञान (आयटी)कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत वाहतूक मंत्रालयाने ट्राफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स पेपरसारख्या कागदपत्रांची मूळ प्रत तपासणीसाठी घेतली जाऊ नये. डिजीलॉकर (DigiLocker)किंवा एमपरिवहन (mParivahan)अॅपमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी दाखवली तरी चालणार आहे. याचा अर्थ ट्राफिक पोलीस आपल्याकडील मोबाइलवरुन क्यूआर कोड स्कॅन करत चालक किंवा वाहनाची संपुर्ण माहिती डेटाबेसवरुन मिळवू शकतात. त्यासाठी मूळ कागदपत्रं जप्त करण्याची किंवा घेण्याची गरज नाही.

First published: August 10, 2018, 3:49 PM IST

ताज्या बातम्या