अफवांवर विश्वास ठेवू नका, निष्पाप जीव घेऊ नका!

अफवांवर विश्वास ठेवू नका, निष्पाप जीव घेऊ नका!

केवळ अफवांमुळे नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत.

  • Share this:

धुळे ता,1 जूलै : धुळे जिल्ह्यातल्या राईनपाड्यात मुलं पळविणाऱ्या टोळीची अफवा पसरली आणि बेभान झालेल्या जामावाने पाच जणांना ठेचून मारलं. महाराष्ट्रातली अशा प्रकारची ही पाचवी घटना आहे. केवळ अफवांमुळे नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत.

लहान मुलांविषयी पालकांमध्ये जिव्हाळ्याची भावना असते. याचाच गैरफायदा घेत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून काही समाजकंटक अशा अफवा पसरवत असतात. आजपर्यंत मुलं चोरणारी टोळी कुणीही पाहिली नाही आणि गुन्हाही नोंदलेला नाही केवळ अफवा आणि संशयावरून नाहक निष्पाप लोकांचा जीव जातोय.

काळजाचा थरकाप उडवणारी घटना : मुलं चोरणारी टोळी समजून पाच जणांची निर्घृण हत्या

राईनपाड्यात काय घडलं? अफवांचा बाजार, बेभान झालेला जमाव आणि रक्ताचा सडा

अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस आणि प्रशासनाने केलंय. असा काही संशय असेल तर त्या लोकांना पोलीसांच्या ताब्यात द्या मात्र कायदा हातात घेऊ नका असं आवाहन गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी केलं आहे.

औरंगाबाद, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. यात गरीब, भटके, अनाथ, भिकारी यांचा बळी जातोय. फक्त महाराष्ट्रातच नाही तर तेलंगना, आंध्रप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश इत्यादी राज्यांमध्येही अशा घटना घडल्या आहेत.

काय घडलं राईनपाड्यात?

धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून राईनपाडा इथं जमावाने 5 जणांची निघृण हत्या केली. दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडलीय. या प्रकरणी 10 जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

राईनपाडा आणि परिसर हा आदीवासी पाड्यांचा भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुलं चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा होती. आज राईनपाडा इथं आठवडी बाजार होता त्यामुळं लोकांची गर्दी होती. आठवडी बाजारामुळं आफवेची चर्चा जास्त झाली.

VIDEO : जळगावमध्ये प्रसन्न यात्रा कंपनीच्या 3 लक्झरी बसेस जळून खाक

संशयावरून काही लोकांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ग्रामपंचायतीच्या खोलीत कोंडून ठेवलं. संत्पत नागरिकांनी या ग्रामपंचायतीला वेढा घातला आणि कार्यालयाची दारं खिडक्या तोडून ते आत घुसले आणि पाचही जणांना प्रचंड मारहाण केली. लाकडाच्या दांडक्याने मारत त्यांना ठार केलं.

 

First published: July 1, 2018, 6:40 PM IST

ताज्या बातम्या