कर्जमाफीच्या निकषावरून अजून संभ्रम, कर्जमाफी फक्त 1 लाखांपर्यंतच

कर्जमाफीच्या निकषावरून अजून संभ्रम, कर्जमाफी फक्त 1 लाखांपर्यंतच

सरकार फक्त १ लाखांपर्यंतची कर्जमाफी देणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय. 31 जुलै 2016पर्यंतची थकबाकीवरच ही एक लाखाची कर्जमाफी मिळणार आहे.

  • Share this:

20 जून : सरकार फक्त १ लाखांपर्यंतची कर्जमाफी देणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलंय. 31 जुलै 2016पर्यंतची थकबाकीवरच ही एक लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. २०१६ - १७ सालच्या थकीत कर्जासाठी सरकारचा वेगळ्या पॅकेजचा प्रस्ताव आहे, त्यावर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय घेऊ असंही पाटलांनी म्हटलंय.

१० हजारांच्या जीआरबाबत काही सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या मुख्यमंत्र्यांशी बोलून जर मान्य झाल्या तर सुधारणा करून शुध्दीपत्रक काढू असंही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, सुकाणू समिती आणि सरकारमधली चर्चा रात्री पुन्हा फिस्कटलीय. सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणू समितीच्या सदस्यांनी सह्याद्री गेस्ट हाऊसमध्येच सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि कर्जमाफीचा जीआरही फाडला. कर्जमाफीवर सरकार ठाम भूमिका घेत नाही, असा आरोप सुकाणू समितीने केलाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2017 09:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading