काँग्रेस गाढवांचा पक्ष; प्रकाश आंबेडकरांना सुशीलकुमार शिंदेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस  गाढवांचा पक्ष; प्रकाश आंबेडकरांना सुशीलकुमार शिंदेंचं प्रत्युत्तर

प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेला आता सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

सोलापूर , 15 एप्रिल : 'काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे आणि निवडणुकीपूर्वी ते असा गाढवपणा करणारंच,' अशी बोचरी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली होती. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेना भेटण्यावरून ज्या चर्चा सुरू झाल्या, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूरमधील काँग्रेसचे - राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभा उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला 'आम्हाला गाढव म्हणणाऱ्यांसारखी आमची संस्कृती नाही' अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी फक्त शिवराज पाटलांना भेटायला गेलो होतो, आम्ही फोटो देखील काढले नाहीत. त्या ठिकाणी फक्त वंचितचे कार्यकर्ते होते त्यांनीच फोटो व्हायरल केले. अशी माहिती सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर दिली आहे. प्रकाश आंबेडकर देखील सोलापूरमधून लोकभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. शिवाय, आरोप – प्रत्यारोपांना देखील जोर चढला आहे.

अखेर आयोगाने केली कारवाई; योगी आणि मायावतींवर प्रचार बंदी

शरद पवार देखील सोलापुरात

दरम्यान, काँग्रेस –राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात येत सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी प्रचार सभा देखील घेतली. भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य , काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे सोलापुरातील रंगत ही तिरंगी झाल्याची पाहायाला मिळत आहे. सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दरम्यान, 23 मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सोलापुरात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

VIDEO: प्रवाशांनो सावधान! 'जेट' आलं जमिनीवर

First published: April 15, 2019, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading