लोकसभेच्या मैदानात सुजय विखे - पाटील अपक्ष?

लोकसभेच्या मैदानात सुजय विखे - पाटील अपक्ष?

लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे - पाटील अपक्ष लढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी आता जागा वाटपावरून नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे अनेक जण आता बंडाच्या तयारीमध्ये देखील आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांचा मुलगा सुजय विखे - पाटलांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवरा साखर कारखान्यामध्ये सुजय विखे - पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरची जागा नेमकी कुणाची?

लोकसभेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी केली आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र नगरची जागा सोडण्यासाठी तयार नाही. त्यावरती तोडगा काढण्यासाठी आता 25 फेब्रुवारी रोजी अंतिम बैठक होणार आहे. पण, त्यापूर्वीचं राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांना पक्षात घेत उमेदवारीचे संकेत दिले आहेत. अनुराधा नागवडे जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरच्या जागेवरती काय तोडगा निघणार? याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवेसेना - भाजप युती

आगामी लोकसभेमध्ये शिवसेना आणि भाजपनं युतीची घोषणा केली आहे. भाजप 25 तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढणार आहे. पण, विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला मात्र अद्याप निश्चित झालेला नाही.

VIDEO : Pulwama : 'खून का बदला लिया', नागपुरात मोदी-गडकरींचे पोस्टर्स

First published: February 23, 2019, 3:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading