News18 Lokmat

शिवसेनेच्या दबावानंतर नाणार प्रकल्प बारगळला

नाणार प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 08:20 PM IST

शिवसेनेच्या दबावानंतर नाणार प्रकल्प बारगळला

मुंबई, 18 फेब्रुवारी : 'नाणार प्रकल्प हा लोकांची मान्यता असेल त्याठिकाणी हलवण्यात येईल' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. युतीची घोषणा करण्याकरता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्नमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित होते. नाणार प्रकल्पाला मिळालेली स्थगिती पाहता शिवसेनेनं कोकणचा गड देखील राखला आहे.

कोकणातील राजापूर येथील नाणार येथे तेल शुद्धीकरण कारखाना उभारण्याची घोषणा करण्यात आली होता. त्याला कोकणातील जनतेने जोरदार विरोध केला होता. पण, शिवसेनेची भूमिका पाहता स्थानिकांमध्ये देखील शिवसेनेविरोधात रोष वाढत होता. पण, युतीची चर्चा करताना शिवसेनेनं नाणारचा देखील मुद्दा पुढे केला. त्यावर अखेर मुख्यमंत्र्यांना लोकांची मान्यता असलेल्या ठिकाणी प्रकल्प हलवणार असल्याची घोषणा करावी लागली.

उद्धव ठाकरेंनी मानले आभार

दरम्यान, नाणार प्रकल्पाला दिलेल्या स्थगितीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. आम्ही भूमिपुत्रांसोबत आहोत अशी भूमिका यावेळी उद्धव यांनी घेतली.

नाणारवरून पेटलं होतं कोकण

Loading...

नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. त्याकरता मोर्चे देखील काढण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये देखील नागरिकांनी धडक मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली होती.अखेर जनमताचा कौल लक्षात घेत सरकारला नाणार प्रकल्पाला स्थगिती द्यावी द्यावी लागली आहे.

नाणार प्रकल्पामध्ये शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप देखील स्थानिकांनी केला होता. त्याचा फटका शिवसेनेला आगामी निवडणुकीमध्ये बसण्याची दाट शक्यता होती.

नारायण राणेंची सेनेवर टीका

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी देखील नाणार प्रकल्पावरून शिवसेनेला वेळोवेळी लक्ष्य केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...