PM मोदींच्या 'मी चौकीदार'ला रोहित पवारांचा उपरोधिक टोला

PM मोदींच्या 'मी चौकीदार'ला रोहित पवारांचा उपरोधिक टोला

...तेव्हा हे चौकीदाराच्या भूमिकेत जातात : रोहित पवार

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सातत्याने पंतप्रधान मोदींवर 'चौकीदार चोर है' हे म्हणत आरोप केले. या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपने मै भी चौकीदार असा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर भाजपच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील नावात बदल केला आहे.

पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नावापुढे चौकीदार असं लिहलं आहे. यावर विरोधकांकडून सोशल मीड़ियावर टीकाही केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी 'मी चौकीदार' वर उपरोधिक टीका करताना एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.

रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये जनतेच्या प्रश्नांना उत्तर देता आलं नाही की सरकार चौकीदाराच्या भूमिकेत जातं असं म्हटलं आहे. विषयांतर न करता विचारलेल्या प्रश्नांची सरकारने उत्तरे द्यावीत असंही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट :

मी शेतकरी आणि माझा हमीभाव?

मी नोकरदार आणि माझी महागाई?

मी विद्यार्थी आणि माझी स्कॉलरशीप?

मी बेरोजगार आणि माझी नोकरी?

मी गृहणी आणि माझे हक्क?

मी उद्योजक आणि माझे आर्थिक धोरण?

मी व्यापारी आणि माझे वाढवलेल टॅक्स?

मी सामान्य भारतीय नागरिक आणि माझा स्वाभिमान?

मी पालक आणि माझ्या मुलांचे भवितव्य?

तुम्ही जे आहात त्या भूमिकेतून प्रश्न विचारा?

उत्तर देता आलं नाही की हे चौकीदाराच्या भूमिकेत जातील. तेव्हा चौकीदारच प्रश्न विचारतील की, नोटबंदीत नोटा बुडवल्या, GST व्यवसाय बुडवले. आत्ता चौकीदारी करायची तर कशाची.

गणिताच्या पुस्तकाला इतिहासाच कव्हर लावलं म्हणून गणित सुटणार नाही, त्यासाठी गणिताचाच अभ्यास करायला हवा. विषयांतर करुन नका जे समोर आहे त्याची उत्तर द्या.

आणि आपण देखील एक गोष्ट लक्षात ठेवुया आपल्या प्रश्नांची उत्तर आपण विचारत राहूया.


Special Report: पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडियावर खिल्ली


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 12:36 PM IST

ताज्या बातम्या