नोएडा, 30 ऑगस्ट: कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात देशात जमाव बंदीचे आदेश असताना दिल्लीपासून जवळच असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये पोलिसांनी एका रेव पार्टीचा पर्दाफाश केला आहे. दारूच्या नशेत तर्रर्र 4 तरुणींसह 11 विदेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा...रुग्णालयात बेड नसल्यानं कारण देत महिला रुग्णाला रस्त्यावरच लावला ऑक्सिजन
उत्तर प्रदेशातील सूरजपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका फ्लॅटमध्ये शनिवार रात्री उशीरपर्यत रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांनी फ्लॅटमधून जवळपास 288 विदेशी बियरच्या बाटल्या आणि विदेशी दारूच्या चार बाटल्या जप्त केल्या आहेत. तर सात लक्झरी कार पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे.
पोलिस उपायुक्त हरीश चंदर यांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार रात्री उशीरा सूरजपूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारे विदेशी नागरिक रेव्ह पार्टी करत आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री फ्लॅटवर छापा टाकला. घटनास्थळी 4 तरुणी आणि विदेशी नागरिक दारूच्या नशेत आक्षेपार्ह अवस्थे आढळून आले. पोलिसांनी टोनी इराहुई, स्टीवन ग्रीसी, एलिन ब्राइस, डिवाइन ओवलोग्वी, नफोर वेतरन, नीजमो कॉल, नोवर्ट मावा, नाल वोगा लाविया, इमॅलिया गिलवर्ट, चियोनी मालामा, कबिलिका मुतीनता या आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी नायझेरियाचे रहिवासी आहेत. आरोपी गेल्या महिन्यांपासून भारतात आले असून ते रेव्ह पार्टीचं आयोजन करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
कोकीनच्या नशेत तर्रर्र अवस्थेत सापडले 3 डझण तरुण-तरुणी...
दुसरीकडे राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी रेव्ह पार्टी करणारे जवळपास 3 डझण तरुण-तरुणींना अटक करण्यात आली होती. रणथंभौर मार्गावरील हॉटेल टायगर मूनमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांनी तरुण-तरुणींना अटक केली होती. सगळ्यांनी कोकीनचं सेवन केल्याचं समोर आलं होतं.
हेही वाचा...धक्कादायक! सोलापुरात काळवीटाची शिकार, मटन विकताना आरोपीला बेड्या
पोलिसांनी घटनास्थळावरून 2 लाख 16 हजार 100 रुपये रोख जप्त केले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कोकीन देखील आढळून आलं. या कोकिनचं मुल्य 29 लाख 67 हजार 900 रुपये सांगितलं जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 8 तरुणींचा समावेश आहे.