मंत्री आठवलेंना अखेर दिल्लीत बंगला मिळाला !

मंत्री आठवलेंना अखेर दिल्लीत बंगला मिळाला !

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना अखेर दिल्लीत हक्काचा शासकीय बंगला मिळालाय.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जुलै : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंना अखेर दिल्लीत हक्काचा शासकीय बंगला मिळालाय.

दिवंगत मंत्री अनिल दवे राहत असलेला 14 सफदरजंग रोड वरचा बंगला आता आठवलेंना मिळणार आहे. मध्यंतरी आठवलेंचं दिल्लीतलं शासकीय घर तत्कालीन सरकारने काढून घेतल्यापासून आठवले दिल्लीत तसे बेघरच होते. त्यावेळी त्यांचं घरसामान रस्त्यावर फेकून दिल्याचं चॅनल्सवरून सर्वांनीच पाहिलं होतं. तेव्हापासून रामदास आठवले महाराष्ट्र सदनातच मुक्कामी असतात, अगदी केंद्रात मंत्री झाल्यानंतरही आठवलेंना हक्काचा शासकीय बंगला मिळाला नव्हता...म्हणूनच मध्यंतरी आठवलेंनी, मंत्रीपदाचं राहू द्या, पण घराचं तेवढं बघा, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. आठवलेंची हीच मागणी अखेर सरकारने मान्य केलीय. त्यांना दिवंगत मंत्री अनिल दवे यांचा शासकीय बंगला राहण्यासाठी दिला जाणार आहे त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासूनच आठवलेंचा महाराष्ट्र सदनातला मुक्काम अखेर 14 सफदरजंग रोडवरच्या बंगल्यात हलणार आहे. आठवलेंना दिल्लीत शासकीय बंगला मिळाल्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते नक्कीच खुश झाले असतील कारण त्यांनाही आता दिल्लीत हक्काचा निवारा मिळणार यात शंका नाही. कारण जीवाभावाचे कार्यकर्ते हेच रामदास आठवलेंचं खरं संचित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 04:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading