पवारांचा पुतण्या राष्ट्रवादीवर कब्जा करतोय- PM मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

पवारांचा पुतण्या राष्ट्रवादीवर कब्जा करतोय- PM मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी यांची राज्यातील पहिली सभा वर्धा येथे होत आहे.

  • Share this:

वर्धा, 1 एप्रिल: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथील सभेत फोडला. मोदींनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार कोणताही निर्णय विचार करुन घेतात. त्यांना कळते देशाची हवा कोणाच्या बाजूने आहे. म्हणून पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर पवारांच्या कुटंबात सध्या लढाई सुरु आहे. खुद्द त्यांच्या पुतण्याकडून पक्षावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याने कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आणि कोठून नाही हे त्यांना कळत नाही, असा टोला ही मोदींनी लगावला.

काय म्हणाले मोदी-

मोदींनी मराठीतून भाषणाला केली सुरूवात

एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करणाऱ्या 'इस्रो'चे मोदींनी अभिनंदन केले

ACमध्ये बसून देशाला सल्ला देत आहे त्यांना माहिती नाही लाखोच्या संख्येने लोक भाजपला आशिर्वाद देण्यासाठी आले आहेत

काँग्रेस नेते म्हणतात मोदींनी शौचालयाची चौकीदारी केली

काँग्रेस नेते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अपमान करत आहेत

काँग्रेस नेत्यांची शिवी माझ्यासाठी दागिना आहे

शरद पवारांना वाऱ्याची दिशा कळते

देशाच्या जनतेने भल्या भल्याना मैदान सोडायला लागले

पवार कुटुंबात सध्या लढाई सुरु आहे

पुतण्या पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे

शरद पवारांच्या हातातून पक्ष निसटत आहे

राष्ट्रवादीला कळत नाही कोणत्या जागातून निवडणूक लढवायची आणि कोणती जागा सोडायची

शरद पवार विचार करुन निर्णय घेतात. त्यांना कळते देशात कोणाची हवा आहे

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते कुंभकर्णाप्रमाणे

शेतकरी असून पवार शेतकऱ्यांना विसरले

सिंचन घोटळ्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ पडला

पवारांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पुतण्याकडूनच शरद पवार क्लिन बोल्ड

एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या धडा शिकवा

आझाद मैदानातील हल्लेखोर आघाडीमुळेच सुटले

हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसमुळे आला

काँग्रेसमुळे देशातील हिंदू बदनाम झाला

हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसने केले

जिथे अल्पसंख्यांक मतदार जास्त आहेत तेथे निवडणूक लढवत आहेत, PM मोदींचा राहुल गांधींना टोला

महाराष्ट्रातील पहिल्या सभेआधी PM मोदींचे मराठीतून ट्वीट!

महाराष्ट्रात येण्याआधी मोदींनी ट्वीटकरुन राज्यातील जनतेला नमस्कार केला आहे. आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे, असे त्यांनी म्हटले होते. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(आ) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे! असे दुसरे ट्वीट त्यांनी केले आहे.

VIDEO : विखे आणि थोरात एकत्र पण एकमेकांकडे पाहिलेही नाही

First published: April 1, 2019, 11:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading