मोहन भागवतांवर मोक्का लावा : प्रकाश आंबेडकर

मोहन भागवतांवर मोक्का लावा : प्रकाश आंबेडकर

जो कायदा माओवादी आणि दहशतवाद्यांना लागू होतो तो संघाच्या लोकांना का नाही, असा सवाल करत आंबेडकर यांनी पोलीस यंत्रणेलाही धारेवर धरलं.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई, 15 ऑक्टोबर : जी शस्रास्र सुरक्षा यंत्रणा वापरत नाही अशी शस्र संघाकडे कशी आहेत, असा सवाल करत भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल केला. पोलिसांनी मोहन भागवत यांच्यावर कारवाई करत मोक्का लावला पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केली.

‘संघाकडे गन्स आणि एके ४७ आहेत. जो कायदा माओवादी आणि दहशतवाद्यांना लागू होतो तो संघाच्या लोकांना का नाही, असा सवाल करत आंबेडकर यांनी पोलीस यंत्रणेलाही धारेवर धरलं. आमचा पूजेला विरोध नाही तर शस्त्र बाळगण्याला विरोध आहे, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ज्यांच्या नावावर ही शस्त्र आहेत त्यांच्याकडे लायसन्स आहे का, हे पाहावं आणि पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी,’ असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आत्तापर्यंत शस्त्र बाळगल्याप्रकरणी संघावर कारवाई न करणाऱ्या नागपूर पोलीस आयुक्तांवरच कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

पोलिसांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि संघावर कारवाई न केल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी दिला.

VIDEO : धक्कादायक VIDEO, रामलीलात तोंडातून आग काढताना कलाकार जळाला

First published: October 16, 2018, 2:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading