लपून वार करू नका, समोर येऊन लढा ; पंकजांचं धनंजय मुंडेंना आव्हान

लपून वार करू नका, समोर येऊन लढा ; पंकजांचं धनंजय मुंडेंना आव्हान

‘पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांतही भाजपचाच विजय होणार आहे’, असा दावाही पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात केला.

  • Share this:

बीड, 18 ऑक्टोबर : ‘लपून-छपून वार करू नका, तर समोर येऊन लढा’, असं म्हणत भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिलं. बीड जिल्ह्यातल्या सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मी वाघची मुलगी आहे, वाघाची मुलगी वाघासारखीच राहणार त्यामुळच मी आक्रमक आहे असही त्यांनी सांगितलं.

‘पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांतही भाजपचाच विजय होणार आहे’, असा दावाही पंकजा मुंडे यांनी या मेळाव्यात केला. दुसरीकडे त्यांनी भाजप अंतर्गत केल्या गेलेल्या सर्व्हेवरही निशाणा साधाला. त्या म्हणाल्या, ‘सर्व्हे बघून लोक मतदान करत नाहीत, तर माणूस बघून मतं दिली जातात.’

भगवानबाबांच्या स्मारकाचं अनावरण

बीड जिल्हामध्ये भगवानबाबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. पंकजा मुंडे यांची भगवानगडावरील दसरा मेळाव्याची परंपरा मागच्या वर्षीपासून खंडित झाली. गडाचे विश्वस्त नामदेवशास्त्री महाराज यांनी विरोध केल्याने पंकजा मुंडे यांना दसरा मेळाव्याचं ठिकाण बदलावं लागलं.

मागच्या वर्षीपासून पंकजा मुंडेचा दसरा मेळावा भगवानबाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव याठिकाणी होत आहे.  याच सावरगावात पंकजा मुंडे यांच्याकडून भगवानबाबांच्या स्मारकांचं दसऱ्याच्या मुहर्तावर उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी भगवान बाबांची 25 फुटांची मुर्ती उभारण्यात आलीय.

ऊसतोड कामगारांसाठी घोषणा

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या कामगारांना खूश करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी 100 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. तसंच उसतोड महामंडळाबाबतचा निर्णय शुक्रवार संध्याकाळपर्यंत होईल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

First published: October 18, 2018, 4:20 PM IST

ताज्या बातम्या