IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, आंबेगव्हाण गावातील विद्यार्थ्यांचा घोर संपला...

IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, आंबेगव्हाण गावातील विद्यार्थ्यांचा घोर संपला...

  • Share this:

रायचंद शिंदे, जुन्नर

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाणच्या विद्यार्थ्यांसाठी कालचा दिवस खासच होता. दरवर्षी तारेच्या पाळण्यावरुन ओढा पार करणारी मुलं यंदा बनवलेल्या पुलावरुन नाचत बागडत शाळेत गेली.

ही दोन दृश्यं पाहा... एका दृष्यात मुलं शाळेत जाण्यासाठी तारेच्या पाळण्यातून ओढा पार करत होती. तर दुसऱ्या दुष्यात मुलं शाळेच्या पहिल्या दिवशी पुलावरुन आनंदानं उड्या मारत शाळेत जातायेत. ही परिस्थिती आहे जुन्नर तालुक्यातल्या आंबेगव्हाण गावातली...

आंबेगव्हाण गावातल्या जवळपास सत्तर मुलांना रोज शाळेत जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून ओढा पार करावा लागत होता. ही बातमी गेल्या वर्षी आयबीएन लोकमतने दाखवली. या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागानं पुलाचं बांधकाम हाती घेतलं. हा पूल आता पूर्ण झाला असून यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलं पुलावरुन नाचत बागडत शाळेत गेली.

गावकऱ्यांनी पुलासाठी सरकारकडं पाठपुरावा केला होता. पण त्याची दखल घेतली गेली नव्हती. आयबीएन लोकमतच्या बातमीच्या दणक्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचा आणि गावकऱ्यांचा प्रवास सुरक्षित झाला आहे.

आंबेगव्हाण गावाचा पावसाळ्यात बाहेरच्या जगाशी संपर्क तुटायचा. पण आता खऱ्या अर्थानं हे गाव एका छोट्याश्या पुलामुळे जगाशी जोडलं गेलंय आणि या कामात आयबीएन लोकमतनं खारीचा वाटा उचलला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2017 11:57 AM IST

ताज्या बातम्या