'दरोडेखोरांच्या टोळीला अटक, पोलिसांच्या टीमचा 35 हजार रुपये देऊन करणार सन्मान'

'दरोडेखोरांच्या टोळीला अटक, पोलिसांच्या टीमचा 35 हजार रुपये देऊन करणार सन्मान'

नाशिकमध्ये पोलीस-दरोडेखोरांमधील चकमकीचा थरार. पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे आणि त्यांच्या पथकाची यशस्वी कामगिरी

  • Share this:

नाशिक, 28 मार्च : नाशिकमध्ये बुधवारी (27 मार्च) रात्री उशिरा सराफाच्या दुकानावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी सहा दरोडेखोरांपैकी टोळीच्या म्होरक्यासहीत तीन जणांना अटक केली आहे. तर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आतापर्यंत राज्यात विविध ठिकाणी टोळीच्या मुख्य आरोपीविरोधात 37 गुन्हे दाखल आहेत. अटक केलेले आरोपी नाशिक, नगर आणि जालन्याचे रहिवासी आहेत. गुन्ह्यात वापरलेली कार इंदिरानगर तर दुचाकी पंचवटीतून चोरण्यात आलेली आहे. दरोडेखोरांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देऊन त्यांच्या मुसक्या आवळणारे पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील घाडगे आणि त्यांच्या टीमचा 35 हजार रुपये देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

नेमकं काय घडलं होतं?

नाशिकच्या आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोणार्कनगर परिसरात रात्री उशिरा दरोडेखोरांनी एका सराफाच्या दुकानावर हात साफ केले. दुकान लुटल्यानंतर दरोडेखोर कारमधून फरार होण्याच्या तयारीत असताना गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना चकवा देऊन पळण्याच्या तयारी असणाऱ्या दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. दरोडेखोरांच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं. जोरदार झालेल्या गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाला. घटनास्थळावरून पळून जाताना एक दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागला. सकाळ होताच मनमाडमधून पोलिसांनी दोन दरोडेखोरांना गजाआड केलं. अजून दोन आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत.

VIDEO : '...तर हीच बॅट डोक्यात घालणार', अर्ज भरताना राजू शेट्टींची आक्रमक प्रतिक्रिया

First published: March 28, 2019, 10:49 PM IST

ताज्या बातम्या