तुकाराम मुंढेंनी भाषणबाजी बंद करून नगरसेवकांचा सन्मान करावा : नाशिकच्या महापौरांचा दुर्गावतार

तुकाराम मुंढेंनी भाषणबाजी बंद करून नगरसेवकांचा सन्मान करावा : नाशिकच्या महापौरांचा दुर्गावतार

अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचा सन्मान न केल्यास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू, असं म्हणत महापौर रंजन भानसी यांनी तुकाराम मुंडेंना अप्रत्यक्ष इशारा दिला.

  • Share this:

नाशिक, 19 ऑक्टोबर : महापौर रंजना भानसी यांनी आज (शुक्रवारी) महासभेत दुर्गावतार धारण करत महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यशैलीवर घणाघाती टीका केली आहे. ‘तुकाराम मुंडेंनी भाषणबाजी बंद करून नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा सन्मान करावा, अन्यथा यापुढे महासभा घेणार नाही असा सरळ इशाराच महापौरांनी दिला.

अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचा सन्मान न केल्यास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करू, असं म्हणत महापौर रंजन भानसी यांनी तुकाराम मुंढेंना अप्रत्यक्ष इशारा दिला. पालिकेच्या महासभेत महापौर रंजना भानसी यांनी दुर्गावतार धारण केलेला पाहायला मिळाला. त्यांनी मुंढे यांच्या प्रशासकीय राजवटीवर जोरदार हल्लाबोल केला.

त्यामुळे अविश्वास प्रस्ताव फसला असला तरी, सत्ताधारी भाजप आणि तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचं चित्र आहे.

याआधी ‘मुंढे हटाव’साठी प्रयत्न

काही दिवसांपूर्वी नाशिक पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. सत्ताधारी भाजपच्या सभागृह नेत्यांनी नगरसचिवांना यासंबंधी पत्र दिलं. आयुक्त हेकेखोर, मनमानी आणि हुकूमशाही पध्दतीनं काम करीत असल्याचा आरोप तुकाराम मुंढे यांच्यावर करण्यात आला. या अविश्वास प्रस्तावाची प्रत ही नाशिक महापौर रंजना भानसी यांच्याकडेही देण्यात आली होती.

यासंबंधी तयार करण्यात आलेल्या पत्रकावर उपमहापौर, स्थायी समिती सभापतींसह स्थायीच्या 15 सदस्यांची स्वाक्षरी करण्यात आली. भाजपसोबत सर्वपक्षीय नगरसेवक आयुक्तांच्या विरोधात आहे, असा दावाही करण्यात आला. पण अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अविश्वास प्रस्ताव मागे घ्यायला लावला.

 

First published: October 19, 2018, 5:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading