निलेश पवार (प्रतिनिधी) नंदुरबार, 26 ऑगस्ट: महिलेची छेड काढल्याप्रकरणी नंदूरबार रेल्वे स्टेशनवर दगडफेक करण्यात आली. यामुळं काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणी तीन ते चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.