नागपूर अंबाझरी ओवर फ्लो पॉईंटवर पर्यटक पावसाचा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेत असताना अचानक एक अज्ञात व्यक्ती हातात चाकू घेऊन लोकांच्या मागे धावू लागला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तेथील लोक प्रचंड घाबरले आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागले. या सगळ्यात एका इसमाने माथेफिरुच्या हातून चाकू काढून घेतला म्हणून मोठा अनर्थ टळला.