राम मंदिराची लगेच उभारणी करावी : मोहन भागवत

राम मंदिराची लगेच उभारणी करावी : मोहन भागवत

'निवडणुकीत चुकलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप करावा लागतो, त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा'

  • Share this:

नागपूर, 18 ऑक्टोबर : शहरी नक्षलवाद हा भारतासमोरील सर्वात मोठा धोका असून सरकारने यावर कडक कारवाई करावी, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी भारत लवकरच विश्वगुरू होईल, असा आशावादही बोलून दाखवला.

‘देश शस्त्र सज्ज असल्यास कोणाची आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही,’ असं म्हणत भागवत यांनी देशाच्या सुरक्षेबाबत आपले विचार व्यक्त केले. दरम्यान, संघाच्या या कार्यक्रमाला नोबेल पारितोषक विजेते कैलास सत्यार्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

भागवत यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

- समाजातल्या उणिवांचा वापर करून उपेक्षितांना हाताशी धरून त्यांचा वापर नक्षलवादी लोक करून घेतात.

- आताच काही जणांना पीडितांविषयी प्रेम दाटून का आलंय?

- देशाची पोलीस दलाची स्थिती जशी हवी तशी नाही.

-योजनांचा पैसा पडून राहतो आणि मार्चअखेर तो वापरण्याची घाई होते, असं का?

- अनुसूचित जाती जमातींसाठीच्या योजना तत्परतेने लागू झाल्या पाहिजेत.

- जो देश शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला तोच देश सुरक्षित राहतो.

- निवडणुकीत चुकलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप करावा लागतो, त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

- निवडणुकीत मतदान न करणे आणि नोटाचा वापर करणे, याचा फायदा अयोग्य उमेदवाराला होतो.

- देशाच्या हितासाठी १०० टक्के मतदान गरजेचं आहे.

- उमेदवाराची प्रामाणिकपणा, क्षमता, त्या पक्षाचं धोरण देशाच्या हिताचं आहे की नाही, याकडे पाहून मतदारांनी मतदान करावं.

- संपूर्ण स्वावलंबनाचा आपण आचार केला पाहिजे.

- अन्नधान्याबाबत आपण स्वयंपूर्ण झालं पाहिजे.

- आपण इतके सक्षम झालं पाहिजे की कोणी आपल्यावर एक कटाक्षही टाकू नये.

- सीमावर्ती भागाच्या विकासावर अधिक भर देण्याची गरज

- देशाची सुरक्षा चांगली, चिंता करण्याची गरज नाही. पण देशाच्या सीमासुरक्षेसोबतच अंतर्गत सुरक्षाही महत्त्वाची आहे.

- देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या सैनिकांच्या परिवाराची सुरक्षा सरकारची जबाबदारी आहे. त्याची गती वाढवणं गरजेचं आहे.

- सत्य आणि अहिंसेच्या आधारावर राजकारणाची स्थापना ही भारताची जगाला देणगी आहे.

First published: October 18, 2018, 10:28 AM IST

ताज्या बातम्या