पुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून

पुण्यात महिलेशी हुज्जत घातल्याच्या रागात जमावाने केला गुंडाचा खून

संध्याकाळी जमावाने अक्षयला शोधून काढले व त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे, १५ ऑक्टोबर : पुण्याजवळील वानवडी येथे जमावाने अक्षय सोनवणे या गुंडाचा खून केला आहे. अक्षय सोनवणे याने महिलेशी हुज्जत घालून तिच्या घरावर दगडफेक केली होती. यानंतर संतापलेल्या जमावाने अक्षयला शोधून काढून त्याला मारहाण केली. यात अक्षयचा मृत्यू झाला.

गुंड अक्षय सोनवणे याने वानवडीच्या तरडी वस्तीमधील थोरात कुटुंबातील महिलेशी हुज्जत घातली. यानंतर थोरात कुटुंबाने पोलीस स्थानकात अक्षयविरोधात तक्रार केली. पण त्यानंतर गुंड अक्षय सोनवणेने थोरात कुटुंबाच्या घरावर दगडफेक केली.

या सर्व प्रकारानंतर संतापलेल्या थोरात कुटुंब आणि आसपास राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी अक्षय सोनवणेचा शोध घ्यायला सुरुवात केली. संध्याकाळी जमावाने अक्षयला शोधून काढले व त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. जमावाने कायदा हातात घेतल्याने वानवडी पोलिसांनी थोरात पती-पत्नीसह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तोकडे कपडे घातले म्हणून विद्यार्थिनीचे कपडे काढण्यास वॉर्डननं पाडलं भाग

First published: October 15, 2018, 1:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading