मुंबई, 19 ऑगस्ट: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर प्रकरणी ईडीने नोटीस पाठविली आहे. 22 ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे नवे हिटलर आहेत. 56 इंचाची छाती असणारे मोदी राज ठाकरेंना घाबरले असा आरोप मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केला आहे.