फडणवीस सरकारच्या अडचणी वाढणार; मराठा क्रांती मोर्चाचा उपोषणाचा इशारा

फडणवीस सरकारच्या अडचणी वाढणार; मराठा क्रांती मोर्चाचा उपोषणाचा इशारा

26 फेब्रुवारी पासून मराठा समाजानं पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, प्रफुल साळुंखे, 22 फेब्रुवारी : सरकारनं मराठा आरक्षणाची घोषणा केली पण, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही असं म्हणत मराठा समजानं पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. सरकारवर नाराज असलेला मराठा समाज 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावरती धरणे आंदोलनाला बसणार आहे. त्याबाबचा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चानं सरकारला दिला आहे.

राज्यभर काढलेल्या 60 मोर्चानंतर राज्य सरकरानं मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये 16 टक्के आरक्षण जाहीर केलं. पण, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे मराठा समाज नाराज आहे. शिवाय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातंर्गत कर्ज देखील मिळत नाही असे काही महत्त्वपूर्ण सवाल करत मराठा समाजानं उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील सुरू आहे. मागासवर्ग आयोगानं दिलेल्या अहवालावरून मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता.


निवडणुकीच्या तोंडावर सरकारला फटका बसेल?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारला मराठा समाजाची नाराजी राजकीय दृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळे सरकारला देखील यावर तातडीनं तोडगा काढावा लागेल.

राज्यभर घुमला 'एक मराठा लाख मराठा' आवाज

आरक्षण, कोपर्डी बलात्कार तसेच इतर मुद्यांवर मराठा समाजानं राज्यभर लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले. काही ठिकाणच्या मोर्चांना हिंसक वळण देखील लागलं. अखेर मराठा समाजाच्या या मोर्चांची दखल घेत सरकारनं मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये 16 टक्के आरक्षणाची घोषणा केली. दरम्यान, आरक्षणाविरोधात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

VIDEO : बाळासह आई गाडीतून पडली, ट्रकखाली येण्यापासून थोडक्यात बचावला चिमुकला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 02:51 PM IST

ताज्या बातम्या