नाफेडची तूर खरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा

नाफेडची तूर खरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा

खरेदीच बंद असल्यानं विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांमध्ये असंतोष धूमसतोय.

 • Share this:

 

पंकज क्षीरसागर, परभणी /बालाजी निरफळ, उस्मानाबाद

24 एप्रिल : सरकारनं म्हणजेच नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्रावर गेल्या दोन दिवसांपासून लांबच लांब अशा गाड्यांच्या रांगा लागल्यात. तूर खरेदीच बंद असल्यानं विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांमध्ये असंतोष धूमसतोय.

 • अकोला-  20 हजार क्विंटल
 • बीड-      65 हजार क्विंटल
 • वर्धा -      2 लाख क्विंटल
 • यवतमाळ - 3 लाख क्विंटल

विदर्भ मराठवाड्यात कुठेही जा, तूर खरेदी करा म्हणून शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. परभणीसारख्या ठिकाणी तर अडीच किलोमीटरपर्यंत रांगा आहेत. शनिवारी नाफेडनं तूर खरेदी बंद केली आणि खरेदी केंद्रावर तूरीनं भरलेल्या वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली.

शेतकऱ्यांनी पिकवलं, सरकारनं वाऱ्यावर सोडलं !

 • राज्यातली जवळपास 300 तूर खरेदी केंद्र बंद केली गेली
 • शेतकऱ्यांकडे जवळपास 500 कोटी रूपयांची आणखी 10 लाख टन तूर पडून
 • आतापर्यंत जवळपास 34 लाख क्विंटल तूर खरेदी केली गेलीय
 • तुरीचा सरकारी हमीभाव (एमएसपी) 5 हजार 50 रूपये जो शेतकऱ्यांना मिळाला नाही
 • बाजारात तूरीचा भाव 4 ते साडे चार हजार रूपये क्विटल
 • गेल्या वर्षी तुरीचा भाव क्विंटलमागे 8 ते 9 हजार रूपये मिळाले
 • गेल्या वर्षी महाराष्ट्रात 4 लाख टन तुरीचं उत्पादन तर आता 20 लाख टन
 • एकट्या विदर्भात 2 लाख क्विंटल तूर रोज बाजारात येतेय
 • महाराष्ट्र आणि कर्नाटक हे देशातल्या अर्ध्या तुरीचं उत्पादन करतात
 • गेल्या वर्षी तुरीचा खुल्या बाजारातील भाव 2 रूपये आता तो 80 ते 90 रूपये प्रती किलो

तूर खरेदीसाठी पहिल्यांदा 15 मार्चपर्यंतची डेडलाईन ठरवली गेली. पण तूरीचं रेकॉर्डब्रेक उत्पादन झाल्यामुळे ही डेडलाईन 15 एप्रिलपर्यंत वाढवली. त्यानंतर तूर खरेदी थांबली नाही. पुन्हा आठवडा दिला गेला. ती डेडलाईन शनिवारी संपली. तरीही राज्यात 10 लाख टन तूर खरेदीशिवाय पडून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 08:58 AM IST

ताज्या बातम्या