ठरलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार दोन जागा

ठरलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार दोन जागा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागावाटपाबाबत अखेर तोडगा निघाला आहे.

  • Share this:

14 फेब्रुवारी, मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागावाटपाबाबत अखेर तोडगा निघाला आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांचं महाआघाडीमध्ये येणं निश्चित झालं आहे. नुकत्याच पार पडलेल्या चर्चेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडण्यात येणार आहे. यामध्ये काँग्रेसच्या कोट्यातील एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील एका जागेचा समावेश असणार आहे.

एनडीएची साथ सोडत शेट्टी महाआघाडीत

2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांनी एनडीएला साथ दिली होती. पण, मतभेद झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी टिका करत एनडीएची साथ सोडली. त्यानंतर राजू शेट्टी महाआघाडीमध्ये सामील झाले.

भाजपविरोधात सध्या देशात महाआघाडीचा प्रयोग होत आहे. देशातील प्रमुख पक्ष यामध्ये सामील झाले आहेत. देशातील प्रमुख नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी पार पडली.

भाजप आमदाराच्या कृषी विकास परिषदेत अश्लील डान्स, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading