News18 Lokmat

पुण्यात 3 शिवशाहीसह 8 बसेस जळून खाक

गॅरेजमध्ये उभा असलेल्या शिवशाही बसेसह खाजगी बसेस आगीत जळून खाक

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 12:23 PM IST

पुण्यात 3 शिवशाहीसह 8 बसेस जळून खाक

पुणे, 20 मार्च : पुणे-सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी येथे गॅरेजजवळ आज सकाळी 10 च्या सुमारास बसेसना आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत 7 ते 8 गाड्या जळून खाक झाल्या होत्या.

शिंदेवाडी येथील गॅरेजमध्ये लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत शिवशाही बसही जळून खाक झाल्या आहेत. तर 10 ते 12 खाजगी गाड्यांना आगीची झळ बसली आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून कुलिंगचे काम सुरू आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Loading...

VIDEO : नागपूरात 20 बसची तोडफोड, पुण्यात 3 शिवशाही बस जळून खाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...