धक्कादायक; वाढदिवसालाच ३ वर्षाच्या मुलीला आईने दिला गळफास

धक्कादायक; वाढदिवसालाच ३ वर्षाच्या मुलीला आईने दिला गळफास

औरंगाबादमध्ये 22 वर्षीय विवाहितेनं 3 वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 18 फेब्रुवारी : माय - लेकीच्या आत्महत्येची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. अमृता किशोर मुळे (वय २२ वर्षे ) मुलगी अवंतिका मुळे (वय ३ वर्षे ) अशी मृतांची नावं आहे. अमृताच्या वाढदिवसाच्याच दिवशी ही घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी बेगमपुरा परिसरातील थत्ते हौदाच्या समोर ही घटना घडली आहे. अमृतानं पहिल्यांदा तीन वर्षाच्या मुलीला गळफास लावला त्यानंतर स्वत:चं आयुष्य संपवलं. मात्र, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल अमृतानं का उचललं? हे अद्याप देखील कळू शकलेलं नाही. अमृताचा रविवारी वाढदिवस होता त्याच दिवशी अमृतानं टोकाचं पाऊल उचलल्यानं कुटुंबियांना धक्का बसला आहे. शिवाय, परिसरामध्ये देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

रविवारी होता वाढदिवस

किशोर आणि अमृताला तीन वर्षाची मुलगी होती. दोघांचा संसार देखील सुखानं चाललं होता. वाढदिवस असल्यानो तो साजरा करण्याचं किशोर आणि अमृतामध्ये ठरलं होतं. त्यानंतर दुपारी दीड वाजता अमृता तीन वर्षाच्या अवंतिकाला घेऊन दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेली. त्या दिवशी किशोर हा घरीच होता. संध्याकाळी अवंतिका आणि अमृतचा उशीरापर्यंत झोपून का राहिल्या? याकरता किशोर अमृता झोपलेल्या खोलीजवळ गेला. त्यानंतर त्यानं बराच वेळ दरवाजा ठोठावला. पण, आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. अखेर दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर समोर असलेलं दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. अमृता आणि अवंतिका दोघींही गळफास घेतलेल्या अवस्थेत होत्या. यावेळी साडीच्या साथीनं अमृतानं गळफास घेतला होता. या घटनेनी माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघींना देखील घाटी रूग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

VIDEO : भाजप शहिदांच्या टाळूवरचं लोणी खात आहे, राष्ट्रवादीचा हल्लाबोल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...