S M L

खडकवासला धरण, पाऊस आणि कांदा भजी ; पुणेकरांची गर्दी

अनेक तरुण तरुणी खडकवासला चौपाटीवर पाऊस झेलत गरमागरम कांदाभजी आणि मक्याचं कणसाचा आस्वाद घेत आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jun 28, 2017 07:29 PM IST

खडकवासला धरण, पाऊस आणि कांदा भजी ; पुणेकरांची गर्दी

हलिमा कुरेशी, पुणे

28 जून : पावसाळा सुरू झाला की पुण्यातील आणि पुण्याबाहेरील पर्यटकांना खडकवासला धरण साद घालतं. तरुणाई रिमझिम पाऊस झेलत आनंद लुटते. यंदा अजूनही मुसळधार पाऊस झाला नसला तरी मुंबईकरांच्या समुद्राला पुण्याचं खडकवासला नक्की टक्कर देतंय. अनेक तरुण तरुणी खडकवासला चौपाटीवर पाऊस झेलत गरमागरम कांदाभजी आणि मक्याचं कणसाचा आस्वाद घेत आहेत.

खडकवासला धरणक्षेत्रात पावसाचं आगमन रिमझीम स्वरूपात झालंय. गेल्या आठवड्याभरात पाऊस चांगला झालाय. मागील वर्षापेक्षा या वर्षीची परिस्थिती समाधानकारक आहे. पण पाणीसाठा वाढण्यासाठी जुलै महिन्यात चांगला पाऊस होणं आवश्यक आहे.खडकवासला धरण क्षेत्रात आज सकाळी ८ पर्यंत 3.05 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. म्हणजेच धरण आता 10.44 टक्के भरलंय. मागीलवर्षी याच वेळी धरणात फक्त 1.54 टीएमसी पाणीसाठा होता. तेव्हा धरण फक्त 5 टक्के भरलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 07:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close