आईचं 'लिव्ह इन'मध्ये राहणं मुलाच्या जीवावर; सावत्र बाप द्यायचा चटके!

आईचं 'लिव्ह इन'मध्ये राहणं मुलाच्या जीवावर; सावत्र बाप द्यायचा चटके!

दिवसभर बाहेर खेळतो म्हणून एका सावत्र बापाने त्याच्या सात वर्षीय मुलाला अमानुषपणे चटके दिल्याची आणि त्याला बेदम मारहाण केल्याची दुर्देवी आणि तितकीच संतापजनक घटना जळवात घडलीय.

  • Share this:

राजेश भागवत, जळगाव, 21 ऑक्टोबर : दिवसभर बाहेर खेळतो म्हणून एका सावत्र बापाने त्याच्या सात वर्षीय मुलाला अमानुषपणे चटके दिल्याची आणि त्याला बेदम मारहाण केल्याची दुर्देवी आणि तितकीच संतापजनक घटना जळवात घडलीय. कांचन नगर परिसरातील ही घटना शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलीय.

शहरातील कांचन नगर परिसरात सुनील भागीरथी हा गेल्या दोन महिन्या पासून एका महिलेसोबत 'लिव्ह इन'मध्ये राहतोय. या महिलेला पहिल्या पतीपासून झालेला सात वर्षांचा मुलगा देखील त्यांच्या सोबत राहतो. मात्र, दिवसभर बाहेर खेळतो म्हणून सुनील भागीरथी हा नेहमीच त्या मुलास बेदम मारहाण करायचा. याबाबत एक-दोनदा शेजाऱ्यांनी सुनीलला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं.

याच कारणावरून शनिवारी रात्री पुन्हा सुनीलने त्या मुलाचे हातपाय बाधले आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळेस अक्षरशः व्हिवळत असलेल्या त्या मुलाने जीवाच्या आकांताने रडण्यास सुरुवात केली. मात्र त्याने आवाज करू नये म्हणून सुनीलने सांडशी गरम करून आणली आणि त्या चिमुकल्याच्या तळपायाला आणि शरिराव चटके द्यायला सुरूवात केली.

एवढ्यात त्पाचा आवाज एेकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि सावत्र बापाच्या तावडीतून त्या मुलाची सुटका केली. घडल्या प्रकारानंतर जमलेल्या नागरिकांनी सुनीलला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे. मुलाच्या जीवाचा भविष्यात उद्भवणारा धोका लक्षात घेता, बालकास उपचारानंतर बालनिरीक्षण गृहात दाखल करण्यात आलंय.

 VIDEO : पुण्यात सात वर्षाच्या चिमुकलीचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2018 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading