राज्याला भरली हुडहुडी; या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या!

राज्याला भरली हुडहुडी; या आहेत आजच्या महत्त्वाच्या बातम्या!

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून त्याचा जोर आणखी काही दिवस राहणार आहे.

  • Share this:

  • राज्यात थंडीचा कडाका वाढला असून त्याचा जोर आणखी काही दिवस राहणार आहे. थंडी वाढल्याने मुंबईकरांची घामांच्या धारांपासून सुटका झाली आहे.
  • काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबई भेटीवर येणार आहेत. मुंबई काँग्रेसमधला वाद आणि आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी ते नेत्यांशी चर्चा करणार आहेत.
  •  पुण्यात निवडणुक आयोगाकडून विविध राजकीय पक्षांना EVM आणि VVPT मशिन्सचे डेमो दाखविण्यात येणार आहेत.
  • 'द एक्सिडेंटल प्रायमिनिस्टर'वर राजकीय वादाला सुरूवात झाली असून मध्य प्रदेशने त्यांच्या प्रदर्शनावर राज्यात बंदी घातली आहे. इतर काँग्रेसची राज्यही त्याचच अनुकरण करण्याची शक्यता आहे.
  • मेघालयात गेल्या 16 दिवसांपासून कोळसा खाणीत 15 मजूर अडकले असून त्यांना वाचविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यात नौदल आणि हवाईदलाचीही मदत घेण्यात येत आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणशी आणि गाझीपूरच्या दौऱ्यावर असून तिथे त्यांची सभाही होणार आहे. इथल्या सभेत ते महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

First published: December 29, 2018, 6:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading