नांदेडमधल्या भोकरमध्ये ऑनर किलिंग; भावानेच केले बहीण आणि तिच्या प्रियकरावर वार

नांदेडमधल्या भोकरमध्ये ऑनर किलिंग; भावानेच केले बहीण आणि तिच्या प्रियकरावर वार

सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा तिच्यावर धारधार शस्त्राने वार केला जात होता तेव्हा कोणीही तिच्या मदतीस धावून आले नाही.

  • Share this:

नांदेड,25 जुलै: नांदेडमधल्या भोकरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली आहे. भावानेच बहीण आणि तिच्या प्रियकरावर धारधार शस्त्राने वार केले आहेत.सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा तिच्यावर धारधार शस्त्राने वार केला जात होता तेव्हा कोणीही तिच्या मदतीस धावून आले नाही.

पूजा वर्षेवार असं या मयत तरुणीचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाचा भोकरमधील एका तरुणाशी विवाह लावून देण्यात आला होता. पण पूजाचे गोविंद कऱ्हाळे या तरूणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे पूजा गोविंद सोबत पळून गेली होती. याचा राग पूजाचा भाऊ दिगंबर दासरेच्या मनात होता. दिगंबरने दोघांचा पत्ता शोधून काढला. त्यांना काही तरी कारण सांगून भोकरला परत घेऊन येताना निवघा रोड परिसरात त्यांच्यावर धारदार शस्त्राने त्याने वार केले. गोविंद कऱ्हाळेचा जागीच मृत्यू झाला पण पूजा काही काळ जिवंत होती. पूजा जखमी अवस्थेतच शेतातून जवळच्या रोडवर आली. रस्त्यावर आल्यावर ती कोसळली. पूजा मदतीची याचना करत होती. पूजा उठून रस्त्याच्या कडेला येऊन बसली. पण यावेळी बघ्यांनी तिला मदत करण्याऐवजी तिचं शूटिंग करण्यात धन्यता मानली. पूजाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. पूजा जवळपास तासभराहून अधिक वेळ जिवंत होती.

पूजाला वेळीच मदत मिळाली असती तर कदाचीत तिला वाचवता आलं असतं अशी हळहळ आता होते आहे.

First published: July 25, 2017, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading