कोर्टाची फी वाढली, राज्याच्या तिजोरीत पडणार 20टक्क्यांनी भर

या विधेयकामुळे राज्याच्या तिजोरीत २० टक्क्यांनी भर पडणार आहे. पण न्यायालयांवर होणारा खर्च कितीतरी पटीने अधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 22, 2017 02:33 PM IST

कोर्टाची फी वाढली, राज्याच्या तिजोरीत पडणार 20टक्क्यांनी भर

22 डिसेंबर : सरकारने न्यायालयीन फीमध्ये वाढ केली आहे. त्याबाबतचं विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलंय. या विधेयकामुळे राज्याच्या तिजोरीत २० टक्क्यांनी भर पडणार आहे. पण न्यायालयांवर होणारा खर्च कितीतरी पटीने अधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यातील न्यायाधीशांची संख्या कमी होती. २०१५मध्ये आम्ही न्यायाधीशांची संख्या २० टक्क्यांनी वाढवली. २०९२ न्यायाधीशांपैकी १९७२ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. देशात सगळ्यात जास्त न्यायाधीश महाराष्ट्रात आहेत. निकाल लवकर लागावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. तसेच तुरुंग आणि न्यायालये डिजिटल माध्यमातून जोडल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही सुनावणी केली जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अशी झाली फी वाढ

१ लाखापर्यंतचा दावा - ५०० रुपयांनी वाढ

२ लाखांपर्यंतचा दावा - २५०० रुपयांनी वाढ

Loading...

५ लाखांपर्यंतचा दावा - ८५०० रुपयांनी वाढ

१० लाखांपर्यंतचा दावा - १८,५०० रुपयांनी वाढ

२५ लाखांपर्यंतचा दावा - ६७,००० रुपयांनी वाढ

१ कोटींपर्यंतचा दावा - ३ लाख ५२ हजार रुपयांनी वाढ

फीवाढीचं कमाल शुल्क - १० लाख रुपयांपर्यंत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...