विजय मल्ल्याला दणका, अलिबागमधलं 100 कोटींचं फार्महाऊस ईडीकडून जप्त

विजय मल्ल्याला दणका, अलिबागमधलं 100 कोटींचं फार्महाऊस ईडीकडून जप्त

  • Share this:

19 मे : भारतातील बँकांचे हजारो कोटी रूपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला ईडीने आणखी एक दणका दिला आहे. ईडीने मल्ल्याचं अलिबागमधलं सुमारे 100 कोटी रूपयांचं फार्म हाऊस ताब्यात घेतलं आहे. मांडवा इथल्या समुद्र किनाऱ्यालगत मल्ल्याचे 17 एकरच्या आलिशान फार्महाऊस आहे.

गेल्यावर्षी या फार्म हाऊसवर तात्पुतरी जप्तीची कारवाईदेखील करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी फार्म हाऊसमध्ये राहणाऱ्यांना ईडीने जागा खाली करण्याची नोटीस दिली होती. त्यानंतर ईडीच्या मुंबईतील पथकाने मल्ल्याचे अलिशान फार्म हाऊस बुधवारी जप्त केलं आहे. या मालमत्तेची किंमत ईडीने 25 कोटी रूपये असल्याचं म्हटले असले तरी बाजारभावानुसार याची किंमत सुमारे 100 कोटी रूपये असल्याचं सांगितलं जात आहे.

First published: May 19, 2017, 2:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading