का रे दुरावा? आमदारांच्या मनोमिलनासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार

का रे दुरावा? आमदारांच्या मनोमिलनासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार

आमदारांमधील नाराजी दूर करण्यासाठी आता उद्वव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 फेब्रुवारी : परस्परांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानंतर अखेर शिवसेना - भाजपनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. या युतीमुळे शिवसेना - भाजपच्या काही आमदार - खासदारांमध्ये नाराजी देखील आहे. शिवाय, दोन्ही पक्षातील नेत्यांनी स्वबळाची भाषा करत एकमेकांवर वैयक्तिक वार देखील केले होते. परिणामी, ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेणार आहेत.

आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एकत्र स्नेह भोजनासाठी भेटणार आहेत. या स्नेह भोजनाच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. युतीच्या 'डिनर डिप्लोमसी'मध्ये दोन्ही पक्षातील आमदारांची नाराजी दूर करण्यात येणार आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या एकत्रित स्नेह भोजनाच्या वेळी लोकसभा मतदार संघातील प्रचार आणि निवडणूक रणनितीवर देखील चर्चा होणार आहे.

युतीची घोषणा झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यामध्ये पुढील मुख्यमंत्री कोणाचा? यावर वाद रंगला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मी आणि उद्धव ठाकरे सांगू तोच अंतिम निर्णय असेल असं म्हटलं होतं.

मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले फडणवीस?

युतीच्या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युलयावरून पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपल्याचे पहायला मिळत होतं. मात्र, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी आणि उद्धव ठाकरे जे पत्रकार परिषदेत बोललो तेच खरे समजा असे सांगितल्याने मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा चेहरा पाहण्यासारखा होता.

युतीच्या मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्याबाबत जर रामदास कदम आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी काही वक्तव्य केले आणि त्यात जर काही तफावत वाटत असेल तर माझे आणि उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य अंतिम आहे हे मानावे असे मुख्यमंत्र्यांनी 'न्यूज १८ लोकमत'च्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

विधानसभेत युतीमध्ये ज्याचा एक आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री, अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री वाटप असा कोणताही फॉर्म्युला नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर संतापलेल्या रामदास कदम यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री ही जर अट मान्य नसेल तर युती तोडा असं विधान केलं होतं. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानंतर झालेल्या वादावर मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकलाय.

VIDEO : 'मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं चुकीचं नाही, पण...' जेव्हा चंद्रकांत पाटील शिवसेनेबाबत बोलतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 12:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading